CoWIN Data Leak: ‘Cowin Portal’ वरून कोट्यवधी नागरिकांचा ‘डेटा लीक’, तृणमूलच्‍या आरोपाला सरकारने दिले ‘हे’ उत्तर… | पुढारी

CoWIN Data Leak: 'Cowin Portal' वरून कोट्यवधी नागरिकांचा 'डेटा लीक', तृणमूलच्‍या आरोपाला सरकारने दिले 'हे' उत्तर...

पुढारी ऑनलाईन : कोविड काळात लसीकरणादरम्यान घेण्यात आलेला कोट्यवधी लोकांचा डेटा मोदी सरकारकडून लीक झाला आहे. यामध्ये व्यक्तीचा वैयक्तिक तपशील, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक, पासपोर्ट क्रमांक, मतदार ओळखपत्र, कुटुंबातील सदस्यांचे तपशील इ. लीक (CoWIN Data Leak) केला गेला असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्याकडून करण्यात आला आहे.या गंभीर आरोपवर केंद्र सरकारने उत्तर दिले आहे.

कोविड काळात लसीकरणादरम्यान घेण्यात आलेला कोट्यवधी लोकांचा डेटा मोदी सरकारकडून लीक झाला आहे, असा आराेप तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी केला आहे. या आरोपाला दुजोरा देणारे काही ट्विट आणि स्क्रीनशॉटही त्यांनी ट्विटरवरून शेअर केले आहेत. यामध्ये कोरोना लस घेणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींपासून, राजकीय व्यक्ती आणि काही पत्रकारांची माहिती देखील या पोर्टलमधून लीक (CoWIN Data Leak) झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याने आपल्या आरोपांची पुष्टी करण्यासाठी व्हायरल झालेले काही स्क्रीनशॉट देखील ट्विटरवरून शेअर केले आहेत.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी डेटा लीकचा आरोप केला आहे, दरम्यान माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, काँग्रेस नेते जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राज्यसभा खासदार सुष्मिता देव, अभिषेक मनु सिंघवी, संजय राऊत यांचा डेटा लीक झाला असल्याची त्यांनी सांगितले.  हा देशासाठी चिंतेचा विषय असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन आणि आयटी विभागाचीही जबाबदारी आहे. असे असताना अश्विनी वैष्णव यांच्या अकार्यक्षमतेकडे पंतप्रधान मोदी किती काळ दुर्लक्ष करतील?, अशी विचारणा देखील गोखले यांनी केली आहे.

CoWIN Data Leak: CoWIN पोर्टलद्वारे वैयक्तिक माहिती गोळा केली जात नाही

CoWIN, कोविड-19 लसीकरण नोंदणी पोर्टल, जन्मतारीख आणि पत्त्यासह व्यक्तीचे कोणतेही वैयक्तिक तपशील संकलित करत नाही. या पोर्टलवर केवळ व्यक्तीने पहिला, दुसरा डोस घेतलेली तारीख दिले जाते. तसेच बुस्टर डोस घेतला असल्यास त्याची नोंद करण्यात येते, असे सरकारी सूत्रांनी आज (दि. १२) सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती म्‍हटलं आहे की, “CoWIN डेटा लीकच्या तपशील अहवालावर आम्ही काम करत आहे. सध्या या आरोपासंदर्भातील माहिती तपासली जात आहे.”

Cowin Portal पोर्टल पूर्णपणे सुरक्षित- भारत सरकार

आरोग्य मंत्रालयाचे ‘Cowin Portal’ हे पोर्टल डेटाच्या गोपनीयतेसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. डेटा लीक सदर्भातील करण्यात आलेले आरोप हे कोणत्याही आधाराशिवाय आणि खोडकर स्वरूपाचे आहेत. आरोग्य मंत्रालयाने इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला (CERT-In) या समस्येकडे लक्ष देण्याची आणि अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे, असे स्पष्टीकरण भारत सरकारकडून देण्यात आले आहे.

 

हेही वाचा:

Back to top button