वकील, पोलिस, साक्षीदारांमुळे देशात दीड कोटींवर खटले प्रलंबित | पुढारी

वकील, पोलिस, साक्षीदारांमुळे देशात दीड कोटींवर खटले प्रलंबित

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  देशातील कनिष्ठ न्यायालयांसह सर्वोच्च न्यायालयात मिळून ४ कोटी ३६ लाख २० हजार ८२७ खटले प्रलंबित आहेत. यातील सुमारे ४० टक्के खटले हे पोलिस, वकील आणि साक्षीदारांच्या दिरंगाईमुळे रखडलेले आहेत, असे डेटा ग्रीडच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

वरील तिन्ही घटकांमुळे देशभरात तब्बल १,६९, ५३, ५२७ खटले रखडले आहेत. प्रलंबित खटल्यांमागील नेमक्या कारणांचा मागोवा घेऊन डेटा ग्रीडने एक अहवाल तयार केला आहे.

आकडे बोलतात…

  • ६१ लाख ५७ हजार २६८ खटल्यांत वकील हजरच होत नाहीत.
  • ८ लाख ८२ हजार खटल्यांत वादी व प्रतिवादी पक्ष सुनावणीला येत नाहीत.
  • २ लाख ५८ हजार १३१ खटल्यांत आरोपी, मुख्य साक्षीदार हजर झाले नाहीत.
  • ३६ लाख २० हजार २९ खटल्यांत आरोपी जामीन घेऊन फरार
  • २८ लाख ७३ हजार ९८४ खटल्यांत मुख्य साक्षीदार न आल्यामुळे सुनावणी बंद
  • १ लाख ६४ हजार २०८ खटल्यांत तो दाखल करणाऱ्यांच्या वारसांचे रेकॉर्ड नोंदले नाही.
  • २६ लाख ४५ हजार ६८७ प्रलंबित खटल्यांना न्यायालयांनी स्टे दिला आहे.
  • १९६० खटल्यांत सुप्रीम कोर्टाद्वारे, १.६९ लाख खटल्यांत हायकोर्टद्वारे स्टे
  • १४ लाख ९४ हजार ९९२ खटल्यांत संबंधित रेकॉर्ड वा दस्तावेज पोलिस तसेच पक्षकारांकडून जमा केले गेले नाहीत.
  • ६६ हजार ४७६ खटले साक्षीदारांची संख्या २० वर असल्याने प्रलंबित आहेत.

Back to top button