राष्ट्रीय
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने ओलांडला दीड लाखाचा टप्पा
नवी दिल्ली : यंदाच्या मे महिन्यात देशाने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा विक्रम नोंदविताना दीड लाखाचा टप्पा पार केला आहे. सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत अनुक्रमे 147 टक्के व 85 टक्के वाढ झाली. तसेच कारच्या विक्रीत 151 टक्के वाढ झाली.

