PM Modi : पंतप्रधान मोदींची सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून चर्चा; जाणून घ्या चर्चेतील मुद्दे | पुढारी

PM Modi : पंतप्रधान मोदींची सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून चर्चा; जाणून घ्या चर्चेतील मुद्दे

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्याशी फोनवर चर्चा केली. पीएमओ कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे. पीएमओने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दूरध्वनी संभोषणादरम्यान नेत्यांनी दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. तसेच परस्पर हिताच्या विविध बहुपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला.

PM मोदींनी (PM Modi) दिल्या हज यात्रेसाठी शुभेच्छा

या संभाषणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन यांना त्यांच्या आगामी हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदानमधून भारतीय नागरिकांना जेद्दाह मार्गे बाहेर काढताना सौदी अरेबियाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोहम्मद बिन यांचे देखील आभार मानले. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय सैनिकांनी जेद्दाह येथे ट्रांझिट पॉइंट उभारले होते. सुदानमधून नागरिकांना पहिले जेद्दाह येथे आणले होते. तेथून त्यांना भारतात आणण्यात आले. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मोहम्मद बिन यांचे आभार मानले.

PM Modi : मोहम्मद बिन यांचा भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी पाठिंबा

मोहम्मद बिन सलमान यांनी भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. तसेच ते त्यांच्या आगामी भारत भेटीसाठी खूप उत्सूक आहेत. दूरध्वनी संभाषणादरम्यान, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला आणि परस्पर हिताच्या विविध बहुपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला.

हे ही वाचा :

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ; लैंगिक शोषण प्रकरणी दोषी; 41 कोटींचा दंड

Donald Trump : ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला दाखल होणार?

Back to top button