स्वदेशी टॉर्पेडोची यशस्वी चाचणी | पुढारी

स्वदेशी टॉर्पेडोची यशस्वी चाचणी

कोची; वृत्तसंस्था :  भारतीय नौदलातर्फे स्वदेशी बनावटीच्या हेवी वेट टॉर्पेडोची यशस्वी चाचणी कोचीमध्ये मंगळवारी घेण्यात आली. पाण्याच्या आत दडलेल्या आपल्या लक्ष्याचा टॉर्पेडोने अचूक वेध घेतला.

भारतीय नौदल व डीआरडीओसाठी जलअंतर्गत मार्‍याच्या क्षेत्रात हे हेवी वेट टॉर्पेडो सर्वोत्तम शस्त्र निर्मितीतील एक मैलाचा दगड आहे. 300 कि.मी. ही त्याची मारकक्षमता आहे. भारतीय नौदलाकडे वरुणास्त्र नावाचे आणखी एक हेवी वेट टॉर्पेडो आहे. त्याची चाचणी 2022 मध्ये झाली होती. तेही डीआरडीओने तयार केले आहे. टॉर्पेडोचे वैशिष्ट्य म्हणजे ते जहाजे व पाणबुडी या दोन्हींमधून सोडले जाऊ शकतात.

Back to top button