Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा कार्यक्रम जाहीर; ५ जानेवारीला ठरणार मतदारांची अंतिम यादी
मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय आयोगाने निवडणूकपूर्व मतदार नोंदणीचा अखेरचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मार्च २०२४ निवडणुकीची शक्यता गृहीत धरून विविध राजकीय पक्षांसह आता केंद्रीय निवडणूक आयोगही तयारीला लागला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि.०२) देशपातळीवर मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर केला.
त्यानुसार १ जून ते २० जुलै निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, २१ जुलै ते २१ ऑगस्ट घरोघरी जाऊन मतदार नोंदणी आणि पडताळणी, २२ ऑगस्ट ते १६ ऑक्टोबर दरम्यान मतदार यादी तयार करण्याची पूर्वतयारी केली जाईल. ५ जानेवारी २०२४ रोजी मतदारांच्या अंतिम यादीवर मोहोर उमटविली जाणार आहे. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादीवर सूचना आणि हरकती मागविण्यात येतील. सुधारणानंतर १ जानेवारी २०२४ रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल.
मतदार नोंदणी अधिकारी म्हणून प्रांत तर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून तलाठी, ग्रामसेवक आणि शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल.
लोकसभा निवडणूक आयोग-२०१९
राज्यातील एकूण मतदार : ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६
मतदान : ५ कोटी ४१ लाख ११ हजार ६२
राज्यातील सध्याची मतदार संख्या
एकूण मतदार : ९ कोटी ३० लाख २ हजार ६२
तरुण मतदार : ४ लाख ९४ हजार ४३७

