Odisha : टॉपर मुलीला आर्थिक अडचणींमुळे रोजंदारीवर कामावर जाण्याची वेळ | पुढारी

Odisha : टॉपर मुलीला आर्थिक अडचणींमुळे रोजंदारीवर कामावर जाण्याची वेळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील कर्मा मदुली या विद्यार्थीनीने १२ वी बोर्डाच्या परिक्षेत ८२.८८ टक्के गुण मिळवले आणि वाणिज्य शाखेतून मलकानगिरी जिल्ह्यात अव्वल आली. मात्र, पुढे या टॉपर मुलीला घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे रोजंदारीवर कामावर जाण्याची वेळ आली आहे. कर्मा मदुली पडेईगुडा गावची राहिवासी आहे. तिने बारावी बोर्डाच्या परिक्षेत उत्तम गुण मिळवले. मात्र, आर्थिक अडचणींमुळे तिला उच्च शिक्षण न घेता रोजंदारीच्या कामावर जावे लागत आहे. (Odisha)

कर्माच्या बारावीतील यशाचे जिल्हाधिकाऱ्यांसह राज्यपालांनीही कौतुक केले होते. सर्वांनी तिच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रसंशा केली होती. जिल्हा प्रशासनाने तिचा सत्कारही केला होता. मलकानगिरीतील बोंडा जमातीतील, कर्मा मुदुलीच्या अपवादात्मक कामगिरीमुळे कलेक्टर आणि गव्हर्नर यांच्यासह उच्च पदस्थ अधिकार्‍यांकडून मान्यता मिळाली, ज्यांनी तिच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा केली. जिल्हा प्रशासनाने तिचा सत्कारही केला होता. (Odisha)

बारावातील या यशानंतर कर्माच्याही आशा वाढल्या. तिने पदवीचे शिक्षण घेण्यासाठी भुवनेश्वरमधील रमादेवी महिला विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र, तिची स्वप्ने विस्कळीत होण्यास वेळ लागला नाही. घरावर आलेल्या आर्थिक संकटांमुळे तिला कठोर परिश्रम करण्यास भाग पडले आहे. (Odisha)

हेही वाचंलत का?

Back to top button