'तो एक भावी नेता ...' महेंद्रसिंह धोनीबाबत आनंद महिंद्रांचे सूचक ट्‍विट | पुढारी

'तो एक भावी नेता ...' महेंद्रसिंह धोनीबाबत आनंद महिंद्रांचे सूचक ट्‍विट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : “महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) आता राजकीय क्षेत्राचा विचार करणे आवश्यक आहे. तो एक स्पष्ट भावी नेता आहे.” असे सूचक ट्‍विट ख्‍यातनाम उद्‍योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी केले आहे. धोनीच्‍या नेतृत्त्‍वाखालील चेन्‍नई सुपर किंग्‍ज संघाने आयपीएल विजेतेपद पटकावल्‍यानंतर त्‍यांनी हे ट्‍विट केले असून, सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

धोनीने राजकीय क्षेत्रात खेळी करण्याचा विचार करणे आवश्यक

मंगळवार ३० मे रोजी आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी  ट्‍विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, “बहुतांश लोकांप्रमाणे मलाही ऐकून आनंद झाला की, महेंद्रसिंह धोनी हा कदाचित आणखी एक वर्ष आयपीएल खेळू शकेल; परंतु मला विश्वास आहे की, त्याने राजकीय क्षेत्राचा विचार करणे आवश्यक आहे. कारण तो “स्पष्ट भावी नेता” आहे.”

आनंद महिंद्रा यांनी यापूर्वी २०२१ मध्ये राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) च्या पॅनेलवर महेंद्रसिंह धोनी याच्‍यासोबत काम केले होते. याबाबत त्‍यांनी म्‍हटलं आहे की, महेंद्रसिंह धोनी हा एक सहयोगी, नम्र आणि तरीही नाविन्यपूर्ण विचार करण्‍यासाठी सदैव तयार असणारा आहे. तो एक स्पष्ट भावी नेता आहे,”

चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने IPL 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध शानदार विजय मिळवला. यानंतर महिंद्रसिंह धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चेन्नईच्या विजयानंतर, इंटरनेटवर धोनी आणि त्याच्या टीमच्‍या खेळाडूंवर शुभेच्‍छांचा वर्षाव होत आहे. एमएस धोनी स्टाईलमध्ये सामना संपवणारा जडेजा हा आयपीएल फायनल मॅचचा हिरो ठरला.

सामना संपल्‍यानंतर निवृत्तीबाबत धोनी काय म्‍हणाला?

सामना संपल्‍यानंतर धोनी म्हणाला होता की, ” तुम्ही परिस्थितीनुसार पाहत असाल तर माझ्यासाठी निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. पण या वर्षी मी आयपीएल खेळण्‍यासाठी जिथे जिथे गेलो आहे तितके प्रेम आणि आपुलकी मला दाखवण्यात आली आहे. सर्वांचे ‘खूप खूप धन्यवाद’. पण माझ्यासाठी कठीण गोष्ट म्हणजे आणखी नऊ महिने कठोर परिश्रम करणे आणि परत येऊन IPL चा आणखी एक सीझन खेळणे; पण शरीरावर बरेच काही अवलंबून आहे, माझ्याकडे आहे. सहा-सात महिने ठरवायचे आहेत आणि ते माझ्याकडून चाहत्यांसाठी भेटवस्तूसारखे असेल. हे माझ्यासाठी सोपे नाही पण त्यांनी ज्या प्रकारे त्यांचे प्रेम आणि आपुलकी दाखवली आहे, तेच मला त्यांच्यासाठी करायचे आहे.”

हेही वाचा : 

Back to top button