Manipur Violence : मणिपूरमध्ये चकमकीत ३० अतिरेकी ठार : मुख्यमंत्री बिरेन सिंह यांची माहिती | पुढारी

Manipur Violence : मणिपूरमध्ये चकमकीत ३० अतिरेकी ठार : मुख्यमंत्री बिरेन सिंह यांची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थिती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. आज (दि. २८) पुन्हा राज्याच्या विविध भागात बंडखोर आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. पहाटे दोन वाजताच्या सुमारास इम्फाळ खोऱ्यात आणि आसपासच्या काही भागात एकाच वेळी हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राज्य सचिवालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील विविध भागात आतापर्यंत सुमारे ३० दहशतवादी मारले गेले आहेत. काही दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी अटक देखील केली आहे. (Manipur Violence)

सुरक्षा दल आणि मणिपूर पोलिसांनी केलेल्या संयुक्‍त कारवाईबाबत माहिती देताना मुख्यमंत्री  बिरेन सिंग म्हणाले की, चकमकीत ठार झालेले दहशतवादी नागरिकांवर हल्ला करत हाेते. ही कारवाई बचावात्मक कारवाईचा भाग म्हणून करण्‍यात आली. आया हल्ल्यात एम-16 आणि एके-47 असॉल्ट रायफल आणि स्निपर गन वापरण्यात आली आहेत. त्यामुळे या अतिरेकी गटापासून नागरिकांना धोका निर्माण झाला होता. याला प्रत्युत्तर म्हणून लष्कर आणि इतर सुरक्षा दलांनी कारवाई केली. (Manipur Violence)

 दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर हल्ले करून राज्यात हिंसक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हालचालीत अडथळा आणू नये, असे आवाहनही या वेळी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी जनतेला  केले. सरकारवर विश्वास ठेवा आणि सुरक्षा दलांना साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा

Back to top button