नव्या संसद भवनाचे आज लोकार्पण

नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी तामिळनाडूतून दाखल झालेले मदुराई अधीनम मठाचे श्री हरिहर देसिका स्वामीगल यांनी पंतप्रधान मोदी यांना ऐतिहासिक सेंगोल (राजदंड) शनिवारी सुपूर्द केला. याप्रसंगी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या.
नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी तामिळनाडूतून दाखल झालेले मदुराई अधीनम मठाचे श्री हरिहर देसिका स्वामीगल यांनी पंतप्रधान मोदी यांना ऐतिहासिक सेंगोल (राजदंड) शनिवारी सुपूर्द केला. याप्रसंगी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या.

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश… जगातील सर्वांत वैविध्यपूर्ण देश… भारताच्या सार्वभौमत्वाचे दिमाखदार प्रतीक ठरेल, अशीच इमारत देशाच्या संसदेसाठी असावी, ही संकल्पना 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कागदावर मांडली… आणि त्यांच्याच कार्यकाळात रविवारी दुपारी 12 वाजता लोकशाहीच्या या सार्वभौम मंदिराचे उद्घाटन होत आहे.

पंतप्रधान मोदी संसदेची नवीन वास्तू देशाला समर्पित करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार तसेच इतर नेते कार्यक्रमात यावेळी उपस्थित राहतील.

जवळपास 21 विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे, तर 25 राजकीय पक्ष या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दोन सत्रांत उद्घाटन सोहळा होणार आहे. सकाळी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ काही धार्मिक विधी केले जातील. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती सहभागी होतील. हे मान्यवर संसद भवन परिसराची व नवीन इमारतीची पाहणी करतील. तामिळनाडूतून खास या सोहळ्यासाठी दाखल झालेल्या संतांनी पंतप्रधान मोदी यांना ऐतिहासिक सेंगोल (राजदंड) शनिवारी सुपूर्द केला असून तो लोकसभा अध्यक्षांच्या आसनाशेजारी स्थापित केला जाईल.

दुपारच्या सत्रात संसद भवन इमारतीचे औपचारिक उद्घाटन होईल. स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून यावेळी 75 रुपयांच्या नव्या नाण्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. तदनंतर पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या पक्षांचा बहिष्कार

काँग्रेससह शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमके, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, भाकप, झामुमो, सीपीआय (एम), आरजेडी, एआयएमआयएम, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स आदी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news