टिपू सुलतानच्या तलवारीला मिळाले 140 कोटी | पुढारी

टिपू सुलतानच्या तलवारीला मिळाले 140 कोटी

लंडन : म्हैसूरचा अठराव्या शतकातील शासक टिपू सुलतानची तलवार लंडनमधील एका लिलावात 14 दशलक्ष पौंडांना म्हणजेच 140 कोटी रुपयांना विकली गेली आहे. बोनहॅम्स लिलावगृहाने हा लिलाव आयोजित केला होता. या तलवारीला आलेली किंमत अंदाजापेक्षा सात पट जास्त असल्याचे सांगण्यात आले.

ही तलवार टिपू सुलतानशी संबंधित असलेल्या सर्व शस्त्रास्त्रांपैकी सर्वात मोठी आहे. उत्कृष्ट कलाकुसर या तलवारीवर रेखाटण्यात आली आहे. ही तलवार टिपूची अत्यंत आवडती होती. टिपू सुलतान मारला गेल्यानंतर, त्याची तलवार ब्रिटिश मेजर जनरल डेव्हिड बेअर्ड यांना त्याच्या धैर्याचे प्रतीक म्हणून सादर करण्यात आली होती, असेही लिलावगृहाने म्हटले आहे.

जर्मन ब्लेड डिझाईनचा वापर

सोळाव्या शतकात भारतात आणलेल्या जर्मन ब्लेड डिझाईनचा वापर करून मुघल कलाकारांनी तयार केलेल्या या शस्त्रांवर ‘शासकाची तलवार’ अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत.

Back to top button