महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवारांना UPSC मध्ये यश | पुढारी

महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवारांना UPSC मध्ये यश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशभरातून यशस्वी झालेल्या उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकूण यशस्वी झालेल्या ९३३ उमेदवारांपैकी १२ टक्के उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. कश्मिरा संख्ये यांनी राज्यात पहिला तर देशात २५ व्या क्रमांकावर यश मिळवले आहे.

यूपीएससीचा २०२२ च्या मुख्य परिक्षेचा निकाला मंगळवारी जाहीर करण्यात आला. निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये राज्यातील ७ पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. एकूण ९३३ उमेदवारांपैकी ६१३ पुरुष आणि ३२० महिलांचा विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे, तर १०१ उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल.

राज्यातील ‘या’ उमेदवारांना यश

अंकिता पवार (28), रूचा कुलकर्णी (54), आदिती वषर्णे (57), दिक्षिता जोशी (58), श्री.मालिये (60), वसंत दाभोळकर (76), प्रतिक जरड (112), जान्हवी साठे (127), गौरव कायंदे-पाटील (146), ऋषिकेश शिंदे (183), अर्पिता ठुबे (214), सोहम मनधरे (218), दिव्या गुंडे (265), तेजस अग्निहोत्री (266), अमर राऊत (277), अभिषेक दुधाळ (278), श्रुतिषा पाताडे (281), स्वप्निल पवार (287), हर्ष मंडलिक (310), हिमांषु सामंत (348), अनिकेत हिरडे (349), संकेत गरूड (370), ओमकार गुंडगे (380), परमानंद दराडे (393), मंगेश खिल्लारी (396), रेवैया डोंगरे (410), सागर खरडे (445), पल्लवी सांगळे (452), आशिष पाटील (463), अभिजित पाटील (470), शुभाली परिहार (473), शशिकांत नरवडे (493), रोहित कदम (517), शुभांगी केकण (530), प्रशांत डगळे (535), लोकेश पाटील (552), ऋतविक कोत्ते (558), प्रतिक्षा कदम (560), मानसी साकोरे (563), सैय्यद मोहमद हुसेन (570), पराग सारस्वत (580), अमित उंदिरवडे (581), श्रुति कोकाटे (608), अनुराग घुगे (624), अक्षय नेरळे (635), प्रतिक कोरडे (638), करण मोरे (648), शिवम बुरघाटे (657), राहुल अतराम (663), गणपत यादव (665), केतकी बोरकर (666), प्रथम प्रधान (670), सुमेध जाधव (687), सागर देठे (691), शिवहर मोरे (693), स्वप्निल डोंगरे (707), दिपक कटवा (717), राजश्री देशमुख (719), महारुद्र भोर (750), अकिंत पाटील (762), विक्रम अहिरवार (790), विवेक सोनवणे (792), स्वप्निल सैदाने (799), सौरभ अहिरवार (803), गौरव अहिरवार (828), अभिजय पगारे (844), तुषार पवार (861), दयानंद तेंडोलकर (902), वैषाली धांडे (908), निहाल कोरे (922).

शिफारस केलेल्या उमेदवारांची आकडेवारी

सामान्य (खुला)-३४५
आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूए)-९९
इतर मागास प्रवर्ग (ओबीसी)-२६३
अनुसूचित जाती (एससी)-१५४
अनुसूचित जमाती (एसटी)-७२

Back to top button