नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या आर्थिक विकासात वस्त्रोद्योग क्षेत्राचा मोठा हातभार आहे. वस्त्रोद्योगातील निर्यात 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरपर्यंत घेऊन जाण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निश्चित केले आहे. त्यामुळे परकीय गुंतवणुकीसह रोजगारनिर्मिती अशा दुहेरी उद्देशपूर्तीसाठी मोदी सरकारने या योजनेवर वेगाने काम सुरू केल्याचे कळते. 'पीएम मित्र'वर त्यामुळे केंद्राची भिस्त आहे. देशात वाढती बेरोजगारी केंद्रातील मोदी सरकार समोरील मोठे आव्हान आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत या मुद्द्यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळू नये यासाठी सातत्याने केंद्र प्रयत्नरत आहे.
कापूस उत्पादक क्षेत्र अशी ओळख असलेल्या विदर्भातील अमरावतीत 'पीएम मित्र' उभारले जाईल. कापूस उत्पादक केंद्राच्या ठिकाणी हे पार्क उभारले जात असल्याने शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळून त्यांची आर्थिक उन्नती होईल. लाखो रोजगाराची निर्मिती होईल.
डॉ. अनिल बोंडे, खासदार, राज्यसभा