पश्चिम बंगाल : घराला आग लागून मायलेकीसह आणखी एकाचा मृत्यू

पश्चिम बंगाल : घराला आग लागून मायलेकीसह आणखी एकाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका घराला आग लागून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही आग रात्री ८.३० च्या सुमारास बजबज पोलिस स्टेशन हद्दीतील नंदारामपूर दासपारा येथे   लागली. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील तपास पोलिस करत आहेत.  वाचा सविस्तर बातमी. (West Bengal)

West Bengal : मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू; मुलगी अल्पवयीन

पोलिसांच्या महितीनूसार, पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील नंदारामपूर दासपारा येथील एका घराला रविवारी (दि.२२) रात्री  आग लागली. या आगीत  एक महिला आणि तिच्या मुलीसह तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग आग रात्री ८.३० च्या सुमारास झाली. या त तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या तिघांमध्ये एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. पोलिसांनी असेही सांगितले की, आगीच्या वेळी हे तिघेही मृत घराच्या टिनच्या छताखाली अडकले होते.

अग्निशमन सेवेच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, घरात फक्त घरगुती वस्तू होत्या. तर  काही स्थानिकांनी आरोप केला आहे की, एक बेकायदेशीर फटाके युनिट कार्यरत आहे. प्राथमिक माहितीनूसार घरात फटाके नव्हते. हे फटाके उत्पादन युनिट आहे की निवासी घर आहे हे स्पष्ट चित्र आम्हाला सकाळीच मिळू शकेल.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news