उष्णतेचा विक्रम! एप्रिल महिनाही देशाच्या इतिहासातील सर्वात उष्ण! | पुढारी

उष्णतेचा विक्रम! एप्रिल महिनाही देशाच्या इतिहासातील सर्वात उष्ण!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गत फेब्रुवारी महिन्याने उष्णतेचा विक्रम केला आहे. हवामान विभागाने 1900 पासून नोंदवलेल्या तापमानाच्या हिशेबाने गत फेब्रुवारी महिना आजवरचा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरला आहे. त्यापाठोपाठ भारताच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात एप्रिल महिन्यानेही मागच्या 122 वर्षांतील सर्व एप्रिल महिन्यांतील उष्णतेचा विक्रम मोडला आहे. 1901 नंतर या वर्षीचा एप्रिल महिना सर्वात उष्ण एप्रिल ठरला आहे. मार्चमध्ये देशात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. गतवर्षी (2022) हवामानातील टोकाच्या स्थितीमुळे अनेक दुर्घटना झाल्या.

तापमानवाढीची कारणे काय?

1) हरितगृह वायू आणि एल निनो यामुळे जगाचे तापमान वाढत असल्याचे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे.
2) विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील एल निनो विकसित झाल्यानंतर वर्षभरात जागतिक तापमानात वाढ होते.

समुद्रातील उष्णतेमुळे दुष्काळ शक्य

  • अल निनोमुळे महासागरांनी मिळून एप्रिलमध्ये 21.1 अंश सेल्सियसचे नवे विक्रमी तापमान नोंदवले आहे. हे मार्च 2016 च्या मागील नोंदीपेक्षा 0.1 अंश जास्त आहे.
  • मे व जुलैदरम्यान अल निनो पुन्हा विकसित होण्याची 60% शक्यता आहे. उष्णतेच्या लाटांचा, चक्रीवादळाचा सामना करावा लागेल. दुष्काळाचीही शक्यता आहे.

आकडे बोलतात…

  • 365 पैकी 314 दिवस गतवर्षी हवामानाची स्थिती टोकाची होती.
  • 3026 लोकांचा जीव यादरम्यान गेला.
  • 19.6 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले.
  • 4,23,249 घरांचे नुकसान देशभरात झाले.
  • 69,899 जनावरे मृत्युमुखी पडली.

Back to top button