नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी पृथ्वी विज्ञान मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना गुरुवारी कायदा आणि न्याय मंत्रालयाहून पृथ्वी विज्ञान मंत्रालयात स्थानांतरित करण्यात आले होते. यासाठी विरोधकांनी त्यांच्यावर तीव्र टीकादेखील केली होती. त्यांना आपला पदभार ग्रहण केल्यानंतर मीडियाशी बातचीतमध्ये सांगितलं की, विरोधक निश्चितपणे माझ्यावर टीका करत आहेत, माझ्याविरोधात बोलत आहेत. पण काहीही समल्या नाही. हे स्थानांतरण कोणतीही शिक्षा नाही, ही सरकारची योजना आहे, हा पंतप्रधान मोदी यांचा दृष्टीकोण आहे.
रिजिजू पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी मला याआधीही वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी दिलीय. खरंतर, किरेन रिजिजूंना दुसऱ्या मंत्रालयाचा कार्यभार दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. काँग्रेस खासदार मणिकम टॅगोर यांनी रिजिजूना 'अयशस्वी मंत्री' म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय हे कारण तर नव्हते? त्यांनी ट्विट केले की, "महाराष्ट्रातील निकालामुळे अस्वस्थ परिस्थिती निर्माण झाली का?"