Air India फ्लाइटमध्ये एकाला पॅनिक अ‍ॅटॅक; मुंबईला पोहोचेपर्यंत फ्लाईटमध्ये मोठा गोंधळ

Air India
Air India

पुढारी ऑनलाइन डेस्क : Air India : न्यूयॉर्कहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) फ्लाइटमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला पॅनिक अ‍ॅटॅक आला. त्यानंतर फ्लाइटमध्ये मुंबईला पोहोचेपर्यंत तब्बल सात तास मोठा गोंधळ उडाला. फ्लाइटमध्ये सात तास सातत्याने आरडाओरड, भीतीचे वातावरण आणि केबिन क्रूची झालेली दमछाक अशा सर्व गोंधळ सुरू होता. मात्र, फ्लाइट वेळेवर मुंबईत पोहोचली. टाईम्स ऑफ इंडियाने फ्लाइटमधील अन्य प्रत्यक्षदर्क्षी प्रवासी प्रवीण तोन्सेकरने दिलेल्या माहितीनुसार याचे वृत्त दिले आहे.

एअर इंडियाची (Air India) फ्लाइट एआय – १४४ मध्ये हा प्रकार घडला. या फ्लाईटने बुधवारी स्थानिक वेळेनुसार १२.२० मिनिटांनी न्यूयॉर्कहून मुंबईला येण्यासाठी उड्डाण घेतले होते. त्यानंतर ३ तासांनी हा प्रकार सुरू झाला. सुमारे ३ तास फ्लाइटमध्ये सर्व शांत आरामदायी वातावरण होते. त्यावेळी एका बिझनेस क्लासच्या एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला पॅनिक अ‍ॅटॅक आला. त्यानंतर फ्लाइट मुंबईला पोहोचेपर्यंत फ्लाइटमध्ये आरडाओरड, भीती, केबिन क्रूची पळापळ असे नाट्य सुरू होते.

Air India : 'थांबा, दरवाजा उघडा' मला उतरायचे आहे; प्रवाशाचा आरडाओरडा

याविषयी प्रवीण तोणसेकर या प्रवाशाने माहिती दिली. प्रवीण या फ्लाइटच्या बिझनेस क्लासच्या ९ के सीटवर बसले होते. ते म्हणाले की, त्यांनी 14 K वर बसलेल्या ज्येष्ठ नागरिकाला फ्लाइट अटेंडंटशी वाद घालताना पाहिले. तो सुमारे 6 फूट उंच होता. बहुतेक तो ७० वर्षाचा असावा. तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे दिसले. मग, अचानक, त्याने किंचाळणे, ओरडणे आणि घाबरून ओरडायला सुरू केले आणि सांगितले की मला उतरायचे आहे. तो ओरडत होता. विमानाचे दार उघडले पाहिजे जेणेकरून तो निघून जाईल. तो 'थांबा, दरवाजा उघडा' असे ओरडत राहिला आणि नंतर ते चालले नाही तेव्हा त्याने क्रूला शाब्दिक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली," तोणसेकर म्हणाले.

तोणसेकर पुढे म्हणाले की, या अ‍ॅटॅकनंतर त्याच्या रागाचा सामना त्याच्या पत्नीलाही करावा लागला. तब्बल ५ फूट उंचीची त्याची पत्नी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचे आम्ही पाहिले. यावेळी केबिन क्रू आणि प्रवाशांनी धाव घेत त्याला रोखले. या प्रकरामुळे त्याची पत्नी इतकी घाबरली की ती बिझनेस क्लासमधून निघून काही काळ इकॉनॉमिक क्लासमध्ये लपून बसली.

Air India : प्रवाशाला शांत करण्यासाठी केबिन क्रूची 'दमछाक'

या माणसाचा हा प्रकार तब्बल सात तास सुरूच होता. प्रवीणने म्हटल्याप्रमाणे क्रू सदस्यांसाठी ही अत्यंत कठीण परिस्थिती होती. क्रूची दुसरी तुकडी, जी साध्या कपड्यात होती ती प्रवाशाला संरक्षणात गुंतवून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी क्रूने जहाजात कोणी डॉक्टर असल्यास त्यांना मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी हवाई जहाजातील दोन डॉक्टरांनी या प्रवाशाला शामक औषधे दिल्यानंतर तो शांत झाला. तो शांत झाल्यावर त्याच्या पत्नीने क्रू ला सांगितले की त्याने टेकऑफनंतर चिंताग्रस्ततेवरील औषधे घेतली नव्हती. दरम्यान तो प्रवासी शांत झाल्यावर विमान सुरळीतपणे पुढे गेले. गुरुवारी दुपारच्या सुमारास मुंबईत उतरले.

"एअर इंडियाच्या फ्लाइटच्या कॅप्टनने डॉक्टर वेणुगोपाल आणि डॉ पटेल या दोन्ही डॉक्टरांचे त्यांच्या सेवेबद्दल आभार मानण्यासाठी पब्लिक अॅड्रेस सिस्टमवर एक घोषणा केली," तोणसेकर म्हणाले.

Air India केबिन क्रू चे कौतुक आणि सत्कार करावे – प्रवासी तोणसेकर

"एअर इंडियाच्या क्रूने एक अपवादात्मक काम केले. दिनेश गोपालकृष्णन, रेगन डीसा, विमल मोरावाला, संजना, अश्विनी गंधरवार, प्रशांत सोनार, बेबी जमालुद्दीन आणि पल्लवी जाधव – या क्रू मेंबर्सना जवळपास सात तास त्रास सहन करावा लागला."

मात्र, क्रू मेंबर्सची एवढी दमछाक होऊनही त्यांनी अन्य प्रवाशांना वेळेवर सेवा प्रदान केली. तसेच फ्लाइट वेळेवर मुंबईत पोहोचेल याची काळजी घेतली. यासाठी घटनेचे प्रत्यक्षदर्क्षी तोणसेकर यांनी त्यांचे कौतुक केले आणि एअर इंडियाने त्यांनी कुशलतेने परिस्थितीला हाताळण्यासाठी त्यांचा सत्कार करून कौतुक केले पाहिजे, असेही म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news