मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पुन्हा भंगले! जाणून घ्या Dk Shivkumar यांचा राजकीय प्रवास…

डी. के. शिवकुमार( संग्रहित छायाचित्र )
डी. के. शिवकुमार( संग्रहित छायाचित्र )
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागेंसह बहुमत मिळवले. काँग्रेसच्या विजयानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे प्रबळ दावेदार होते. मात्र पक्षश्रेष्‍ठींनी मुख्‍यमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांची निवड केली. यामुळे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (Dk Shivkumar) यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले असून, त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले आहे. जाणून घेवूया डीके शिवकुमार यांच्‍या राजकीय प्रवासाविषयी…

कर्नाटकच्या मुख्यमंत्री शर्यतीत आणखी एक नाव होते ते म्हणजे डीके. शिवकुमार यांचे. मात्र काँग्रेस पक्षातील एकजूट कायम ठेवण्यासाठी त्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले (Dk Shivkumar) आहे. त्यांनी यापूर्वी देखील पक्षहित महत्त्वाचे असल्याचे माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले होते.

कर्नाटकचे सुरक्षित भविष्य अन् जनतेचे कल्याण हेच आमचे प्राधान्य: डीके शिवकुमार

सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री असतील, अशी घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी केली.  डीके शिवकुमार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कर्नाटकचे सुरक्षित भविष्य आणि येथील जनतेचे कल्याण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याची हमी देण्यासाठी आम्ही एकजूट असल्याचे देखील डीके शिवकुमार यांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात सांगितले आहे. यावेळी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे, नुकतीच घोषणा झालेले कर्नाटकचे मुखमंत्री सिद्धरामय्या आणि स्वत: डीके शिवकुमार यांच्यातील एकजूट दाखविणारा फोटो देखील ट्विट केला आहे.

Dk Shivkumar: कोण आहेत डीके शिवकुमार?

डीके शिवकुमार यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते ख्‍यातनाम उद्याेगपती व  प्रगतशील शेतकरी म्हणून देखील ओळखले जातात. डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुक २०२३ मध्ये ते कनकपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आर अशोक यांचा पराभव केला. यापूर्वीही त्यांनी ३ वेळेस विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. २००८, २०१३ आणि २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. यावेळच्या विधानसभा २०२३ मध्ये देखील त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी त्यांचे नाव चर्चेत होते. परंतु, पक्षहितासाठी डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्री पदाची याहीवेळी संधी हुकली आणि त्यांना कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news