पश्चिम बंगालमध्ये ‘मोखा’ चक्रीवादळामुळे 9 ठार | पुढारी

पश्चिम बंगालमध्ये ‘मोखा’ चक्रीवादळामुळे 9 ठार

कोलकाता, वृत्तसंस्था : मोखा चक्रीवादळ () म्यानमारच्या सागरी किनारपट्टीवर धडकल्यानंतर कमजोर पडलेले असले तरीही भारतातील पूर्वेकडील राज्यांवर त्याने कहर केलेला आहे. सोमवारी रात्री पश्चिम बंगाल आणि मिझोरामला त्याचा फटका बसला आहे. ‘मोखा’मुळे झालेल्या दुर्घटनांतून कोलकातासह दक्षिण बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी नऊ जण मरण पावले आहेत.

कोलकाता येथे जोरदार वार्‍यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक वाहनांचे नुकसान झाले. एक ट्रॅफिक सिग्नलची चौकीही उखडली.

विमानसेवेवर परिणाम

कोलकाता विमानतळावर वार्‍याचा वेग ताशी 84 कि.मी. असल्याने संध्याकाळी 5.30 ते 6.20 दरम्यान किमान 5 उड्डाणे वळवण्यात आली आणि 12 उड्डाणांना उशीर झाला. रुळांवर झाडे उन्मळून पडल्याने काही अंशी रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली.

रोहिंग्या मुस्लिम सुरक्षित स्थळी

मिझोराममध्ये 236 घरांची पडझड झाली. म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांच्या 9 छावण्या उद्ध्वस्त झाल्या. निर्वासितांना विविध शाळा आणि मंगल कार्यालयांसारख्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

Back to top button