Terror funding case : पुलवामा, शोपियानमध्‍ये ‘एनआयए’चे छापे, दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्‍याप्रकरणी कारवाई | पुढारी

Terror funding case : पुलवामा, शोपियानमध्‍ये 'एनआयए'चे छापे, दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्‍याप्रकरणी कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्‍याप्रकरणी राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) आज ( दि.१५) जम्‍मू-काश्‍मीरमधील पुलवामा आणि शोपियानमध्‍ये अनेक ठिकाणी छापे टाकले. पूंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. यानंतर दुसर्‍याच आठवड्यात ‘एनआयए’ने ही कारवाई केली आहे. ११ मे रोजी ‘एनआयए’ने कांसीपोरा येथील अब्दुल खालिक रेगू, सय्यद करीम येथील जाविद अहमद धोबी आणि बारामुल्ला जिल्ह्यातील संगरी कॉलनी येथील शोएब अहमद चोर यांच्या घरावर छापे टाकले होते. ( Terror funding case )

रेझिस्टन्स फ्रंट (TRF), युनायटेड लिबरेशन फ्रंट जम्मू आणि काश्मीर (UL J&K), मुजाहिदीन गजवत-उल-हिंद (MGH), काश्मीर फ्रीडम फायटर्स (JKFF), काश्मीर टायगर्स, PAAF अशा दहशतवादी संघटनांमध्‍ये सक्रीय असणार्‍या दहशतवाद्‍यांनवर ‘एनआयए’ने छापेमारी केली. ५ ऑगस्‍ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला देण्‍यात आलेला विशेष दर्जा रद्द केला. यानंतर हे दहशतवादी गट चर्चेत आले आहेत.

पाकिस्‍तान पुरस्‍कृत दहशवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवली जात आहे. दहशतवादी संघटना काश्‍मीरमध्‍ये शस्त्रे, बॉम्ब, ड्रग्स इत्यादी पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत. या प्रकरणी पोलिस आणि निमलष्करी दलांच्या मदतीने केंद्रीय एजन्सीच्या गुप्तचरांनी काश्मीरमधील श्रीनगर, बारामुल्ला, शोपियान, कुलगाम, अनंतनाग आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये तसेच पूंछ, राजौरी आणि किश्तवार जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button