राजधानीत ‘पीयूसी’ तपासणीसाठी ५०० पथकांची तैनाती; आप’ सरकारचा निर्णय | पुढारी

राजधानीत 'पीयूसी' तपासणीसाठी ५०० पथकांची तैनाती; आप' सरकारचा निर्णय

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय राजधानीत हिवाळ्यात उद्भवणाऱ्या वायू प्रदूषणावर आळा घालण्याच्या दिल्ली परिवहन विभागाने वाहनांसाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) बंधनकारक केले आहे. पेट्रोल,सीएनजी पंपावर तैनात पथकांना इंधन भरतांना ही कागदपत्रे दाखवण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहेत. मोटार वाहन कायद्यानूसार वाहन चालकांना पीयूसी सोबत बाळगणे बंधनकारक आहे. पंरतु,अनेक वाहन चालकांकडे हे प्रमाणपत्र नसते.अश्यात राजधनाची निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने हे अभियान हाती घेतले आहे.

पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांविरोधात व्यापक अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे देखील विभागाकडून सांगण्यात आले आहे. शहरात जवळपास ५०० पथके तैनात करण्यात येणार आहेत. पथकांकडून प्रामुख्याने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची तपासणी केली जाईल.

ज्या वाहन चालकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नाही त्यांना वाहन प्रदूषणासंबंधी तपासणी करण्याची विनंती केली जाईल,असे परिवहन विभागातील अधिकार्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा त्यांना पीयूसी प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश या मोहिमेचा आहे.

पंरतु, प्रदूषणासंबंधीची तपासणी करण्यास नकार देणार्या आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणार्या वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाईल. शिवाय आदेशानूसार दोषी आढळणार्या चालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी जप्त केला जाईल,असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांविरोधात मोटार वाहन कायदा,१९९३ अंतर्गत १९० (२) अन्वे चालान कारवाई केली जाईल. सहा महिन्यांचा कारावास अथवा १० हजारांचा दंड असे शिक्षेचे प्रावधान याअंतर्गत आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button