CBSE 12th Result 2023 | सीबीएसई १२ वी निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा निकाल | पुढारी

CBSE 12th Result 2023 | सीबीएसई १२ वी निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा निकाल

पुढारी ऑनलाईन : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE ने १२ वी २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल अधिकृत वेबसाइट – results.cbse.nic.in, cbseresults.nic.in, cbse.gov.in आणि digilocker.gov.in वर पाहाता येतील. विद्यार्थी त्यांचे रोल नंबर, admit card ID, शाळा क्रमांक आणि जन्मतारीखेच्या आधारे त्यांचे गुण तपासू शकतात. या वेबसाइट्स व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल उमंग ॲप्सवर देखील पाहायला मिळतील. (CBSE 12th Result 2023)

१२ वीचे मूल्यांकन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण झाले. याआधारे CBSE ने निकाल जाहीर केला आहे. १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल दरम्यान ही परीक्षा झाली होती. यंदा १६.६० लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ५० हजार १७४ विद्यार्थी म्हणजेच ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी घटली आहे. गेल्या वर्षी ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

तिरुवनंतपूरम प्रदेश ९९.९१ टक्क्यांसह अव्वल स्थानी आहे. यंदा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.६८ टक्के असून ती मुलांपेक्षा ६.०१ टक्के अधिक आहे. CBSE ने यंदा गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही.

CBSE 12th Result 2023- निकाल कोठे पाहाता येईल? (cbse 12th result 2023 check online)

cbseresults.nic.in

results.cbse.nic.in

निकाल ऑनलाइन कसा पाहाता येईल

results.cbse.nic.in वर जा

12th निकालाच्या पेजवर जा

विचारलेली माहिती भरून लॉग इन करा

तुमचा CBSE निकाल तपासा आणि डाउनलोड करा

Scorecard तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

-बोर्ड परीक्षेचा रोल नंबर

– ॲडमिट कार्ड

– शाळा क्रमांक

– जन्मतारीख

अधिकृत वेबसाइट क्रॅश झाली तर? निकाल तपासण्याचे पर्यायी मार्ग

UMANG App

DigiLocker

हे ही वाचा :

 

Back to top button