ALH Dhruv हेलिकॉप्टरचे ऑपरेशन थांबवले, जम्मू-कश्मीरमधील दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराचा निर्णय

ALH Dhruv हेलिकॉप्टरचे ऑपरेशन थांबवले, जम्मू-कश्मीरमधील दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराचा निर्णय

पुढारी ऑनलाईन : भारतीय लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर (ALH Dhruv choppers) ४ मे रोजी कोसळले होते. यात एक जवान शहीद झाला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराकडून खबरदारीचा उपाय म्हणून एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरचे ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. याबाबतची माहिती संरक्षण दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या दोन अपघातांमुळे हे हेलिकॉप्टर महिनाभराहून अधिक काळ थांबवण्यात आले होते.

संरक्षण अधिकार्‍यांनी शनिवारी सांगितले की, "अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर (एएलएच) ध्रुव हेलिकॉप्टरचे ऑपरेशन ४ मे रोजी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून थांबविण्यात आले आहे."

गेल्या गुरुवारी भारतीय लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर ४ मे रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडजवळ कोसळले होते. यावेळी त्यात तीन अधिकारी होते. या दुर्घटनेत एक तंत्रज्ञाचा मृत्यू झाला होता आणि दोन पायलट जखमी झाले होते. गुरुवारी झालेला हा अपघात २०२१ पासून जम्मू-काश्मीरमध्ये झालेला लष्कराच्या हेलिकॉप्टरचा पाचवा अपघात होता.

भारतीय लष्कराच्या निवेदनात म्हटले होते की, "पायलटनी एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) कडे तांत्रिक बिघाड झाल्याचे कळवले होते. लँडिग परिसर व्यवस्थित नसल्याने हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग झाले." गुरुवारी सकाळी ११.१५ च्या सुमारास मोहिमेवर निघालेल्या ध्रुव हेलिकॉप्टरला (ALH Dhruv choppers) किश्तवाडमधील मरुआ नदीच्या काठावर लँडिंगदरम्यान अपघात झाला होता.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news