Badrinath Yatra : बद्रीनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली, वाहतूक बंद, हजारों यात्रेकरू अडकले (पाहा व्हिडिओ) | पुढारी

Badrinath Yatra : बद्रीनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली, वाहतूक बंद, हजारों यात्रेकरू अडकले (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाइन डेस्क : बद्रीनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे महामार्गावर मलबा जमा झाल्याने यात्रेचा मार्ग बंद झाला असून हजारो यात्रेकरू अडकले आहेत. महामार्गाच्या बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ही घटना चमोली जिल्ह्यातील एका गावात बद्रीनाथ महामामार्गावर घडली.

दरम्यान, घटनेनंतर बद्रीनाथ यात्रा प्रशासनाने थांबवली आहे. महामार्गावर दरड कोसळ्यालाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हे दृश्य अतिशय भयावह आहे. सुदैवाने घटनेत कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही.

दरम्यान, या घटनेनंतर बद्रीनाथ यात्रेला ठिकठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे. दरड कोसळलेल्या मार्गावर साचलेला मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सीओ कर्णप्रयाग अमित कुमार म्हणाले, “हेलांगमधील बद्रीनाथ रस्ता उघडल्यानंतर प्रवाशांना जाण्याची परवानगी दिली जाईल. वाहतूक सुरक्षेबाबत पोलिसांचा इशारा आहे, पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.”

हे ही वाचा :

Joshimath : हेलांग बायपास प्रकल्प थांबवा; नाहीतर बद्रीनाथ यात्रा रोखू : जोशीमठवासीयांचा इशारा

उत्तराखंड : ऋषिकेश-बद्रीनाथ मार्गावर भाविकांची कार दरीत कोसळली, महाराष्ट्रातील चार भाविकांनी गमावला जीव

 

Back to top button