Globle hunger index : बांगलादेश, पाकिस्तानने भारताला टाकले मागे | पुढारी

Globle hunger index : बांगलादेश, पाकिस्तानने भारताला टाकले मागे

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

ग्लोबल हंगर इंडेक्स २०२१ ( Globle hunger index ) ची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. या यादीनुसार भारताच्या स्थानात घसरण झाली असून भारत १०१ व्या स्थानी पोहचला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत भारताची ७ अंकांनी घसरण झाली आहे. यासह आपल्या शेजारील बांगलादेश आणि पाकिस्तानने देखिल भारताला पिछाडीवर टाकले आहे. तसेच भारत त्या ३१ देशांमध्ये समाविष्ट झाला जेथे भूकबळीची समस्या अत्यंत गंभीर मानली जाते.

ग्लोबल हंगर इंडेक्स २०२१ च्या  ( Globle hunger index ) अहवालामध्ये भारतातील भूकबळी समस्येवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार कोविड-१९ मुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गंभीर समेस्यांना सामोरे जावे लागले आहे. २०२० मधील १०७ देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान ९४ वे होते. शिवाय अहवालानुसार भारताचा जीएचआय (भूकेचा स्तर) हा स्कोर सुध्दा कमी झाला आहे. २००० साली हा स्कोर ३८.८ होता. तर २०१२ पासून २०२१ च्या दरम्यान तो २८.८-२७.५ पर्यंत जावून पोहचला आहे.

Globle hunger index

शेजारच्या राष्ट्रांनी भारताला टाकले पिछाडीवर ( Globle hunger index )

या यादीनुसार शेजारील राष्ट्रांनी भारताला पिछाडीवर टाकले आहे. भारताचे सख्खे शेजारी नेपाळ व बांगलादेश अनुक्रमे ७६ व्या स्थानी आहेत. तर पाकिस्तान ९२ व्या स्थानी आहे. या देशांमध्ये देखिल भूकबळींची समस्या चिंताजनक आहे. पण, भारताच्या तुलनेत तेथील नागरिकांना अन्न पुरविण्यासाठी अधिक चांगले प्रयत्न केले जात असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.

भारतालाच्या मागे आहेत ‘हे’ १५ देश ( Globle hunger index )

शेजारील राष्ट्रांनी अर्थान नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान यांनी भारताला पिछाडीवर टाकले आहे. भारताच्याही मागे १५ देशांचा समावेश आहे. पण, ही बाब अभिमानास्पद नाही कारण भारताच्याही मागील स्थानावर आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेमधील मागास आणि गरीब देशांचा समावेश आहे. त्यांच्या तुलनेत भारत अधिक विकसनशील आणि समृद्ध देश आहे. तरी देखिल अतिशय मागास व गरिब समजल्या जाणाऱ्या देशांसोबत भारताची तुलना केली जात आहे. या यादीमध्ये पापुआ न्यू गिनिया (१०२), अफगानिस्तान (१०३), नायझेरिया (१०३), कांगो (१०५), मोजाबिंक (१०६), सिएरा लियोन(१०६), चैड (११३), सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक(११४), यमेन(११५) आणि सोमालिया (११६) हे देश भारताच्या मागे आहेत.

ग्लोबल हंगर इंडेक्स २०२१ चा अहवाल ( Globle hunger index )

ग्लोबल हंगर इंडेक्स २०२१ चा अहवाल आर्यलँड च्या कंसर्न वर्ल्ड वाईड आणि जर्मनीच्या वेल्ट हंगर हायलाईफ या संस्थांनी मिळून तयार केला आहे. या अहवालानुसार भारताच्या जीआयएस स्कोर (भूकेचा स्तर) मध्ये अत्यंत चिंताजन बदल निदर्शनास आले आहेत. या वर्षी भारताचा जीएचआय स्कोर हा २७.५ इतका आहे.

Back to top button