Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ | पुढारी

Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन डेस्क – दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने अबकारी धोरण घोटाळाप्रकरणी (Delhi Excise Policy Case) दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ८ मे पर्यंत वाढ केली आहे. (Delhi Excise Policy Case)

ईडीच्या वकिलांनी कोर्टात माहिती देत सांगितलं की, मनीष सिसोदियांना ९ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. १० मार्चला रिमांडवर घेण्यात आलं होतं. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. न्यायालयीन कोठडीत वाढ केल्यानंतर मनीष सिसोदिया कोर्टाबाहेर येताना म्हणाले की, ‘मोदीजी कितीही कट रचू देत, पण दिल्लीत केजरीवाल यांचे काम रोखू शकत नाहीत.’

Back to top button