पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय शेअर बाजाराच्या Shares Market Opening Bell सुरुवातीला आज तेजी किंवा उतार दिसून आला नाही. आज मंगळवारी, NSE निफ्टी 50 8.95 अंकांनी किंवा 0.05% घसरून 17,734.45 वर आणि BSE सेन्सेक्स 13.86 अंकांनी किंवा 0.02% घसरून 60,042.24 वर आला. त्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजार सपाटपणे उघडले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, बँक निफ्टी 14.8 अंक किंवा 0.03% घसरून 42,620.95 वर आणि निफ्टी फार्मा 54.9 अंक किंवा 0.44% घसरून 12,399.45 वर आला.
सकाळच्या सत्रात भारतीय बाजारात हालचाली मंदावलेल्या जाणवल्या. बाजार सपाट उघडला असून सकाळच्या पहिल्या सत्रात तासाभरात सेन्सेक्स अवघ्या 10 अंकांनी वर आला आहे. बाजार विश्लेषकांनी म्हटल्यानुसार गुंतवणूकदार कंपन्यांच्या तिमाही निकालाची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे त्याचा आज मंगळवारी बाजारावर प्रभाव पडला. 13 प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी सात माहिती तंत्रज्ञान (IT) आणि फार्मा समभागांमध्ये प्रत्येकी 0.5% घसरण झाली. Shares Market Opening Bell
निफ्टी 50 वर इंडसइंड बँक, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, बजाज फिनसर्व्ह आणि जेएसडब्ल्यू स्टील हे सर्वाधिक लाभधारक होते. तर यूपीएल, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाइफ, कोटक बँक आणि टीसीएस हे नुकसानीत होते. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी वाढून 81.87 वर पोहोचला.
इंडसइंड बँक बँकेचे शेअर्स उत्तम परफॉर्म करत असून . IndusInd Bank Ltd ने मार्च तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगला नफा नोंदवल्याने 2% पेक्षा जास्त वाढ झाली. निफ्टी 50 इंडेक्समध्ये हा स्टॉक टॉप गेनर आहे. ते 2 टक्क्यांनी वाढले आहे. तर बजाजच्या दोन्ही कंपन्या बजाज फिन्सर्व आणि बजाज फायनान्स यांचे देखील शेअर्स दोन टक्क्यांनी वधारले आहे. पुढील काही सत्रांसाठी बाजार श्रेणीबद्ध राहतील अशी विश्लेषकांची अपेक्षा आहे.
हे ही वाचा :