छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत सामाजिक न्याय राष्ट्रीय परिषद | पुढारी

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत सामाजिक न्याय राष्ट्रीय परिषद

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त गुरूवारी (दि. २७) दिल्लीतील कॉस्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे ‘सामाजिक न्याय राष्ट्रीय परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. राजर्षी छ.शाहू स्मृती शताब्दी संयोजन समिती, दिल्लीच्या वतीने आयोजित या परिषदेत अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत हजेरी लावतील. दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या परिषदेत आरजेडीचे खा.मनोज कुमार झा,राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, दिल्लीचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम, डीएमके खासदार विल्सन पी.प्रामुख्याने उपस्थित राहतील.

प्रबोधनात्मक सत्रासाठी मंडल आयोगाचे बी. पी. मंडल यांचे नातू प्रा. सुरज मंडल (दिल्ली विद्यापीठ), प्रा.हरिश वानखेडे (जेएनयू), सामाजिक कार्यकर्ते प्रा. मिलिंद आव्हाड, परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाश्मी संबोधित करतील. देशातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

अशा परिस्थितीत छ.शाहू महाराजांचे विचार व धोरणे प्रासंगिक व महत्त्वाची बनली आहेत, या उद्देशाने महाराजांच्या विचारांची पुनर्पेरणी करणारे कार्यक्रमांचे आयोजन महत्वाचे असल्याचे मत समिती सदस्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले आहे. परिषदेच्या यशस्वीतेसाठी गिरीश फोंडे, नितीन माने, प्रशांत टंडन, डॉ.अमृता कुमारी, कुश आंबेडकरवादी अॅड. विजया खोपडे, संतोष कुमार, धीरेंद्र तिवारी कार्यरत आहेत.

हेही वाचा 

Back to top button