देशातील पहिल्या ‘वॉटर मेट्रो’चा आज पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ | पुढारी

देशातील पहिल्या 'वॉटर मेट्रो'चा आज पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  पाण्यावर धावणाऱ्या देशातील पहिल्या ‘वॉटर मेट्रो’ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी केरळमधील कोची येथे होणार आहे. विशेष म्हणजे हा केवळ देशातला नव्हे तर जगातला अशा प्रकारचा पहिला परिवहन प्रकल्प आहे.
वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी 23 वॉटर बोट आणि 14 टर्मिनल असणार असून चार टर्मिनल पूर्णपणे सुरू झाले आहेत. कोची वॉटर मेट्रो या नावाने हा प्रकल्प ओळखला जाईल. कोचीसारख्या शहरात वॉटर मेट्रो उपयुक्त ठरणार आहे. ही कमी किमतीची ‘मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’ आहे. कोची आणि त्याच्या आसपासची 10 बेटे वॉटर मेट्रोमुळे जोडली जाणार असल्याने त्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. वॉटर मेट्रो प्रकल्प 78 किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. कोची बंदर तसेच शहराच्या विकासाला या प्रकल्पामुळे गती येईल, असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

 

Back to top button