Amritpal Singh : अटकेनंतर अमृतपालला आसामच्या दिब्रुगढ तुरुंगात नेणार; भटिंडा एअरबेसवरून पोलीस दिब्रुगढला रवाना | पुढारी

Amritpal Singh : अटकेनंतर अमृतपालला आसामच्या दिब्रुगढ तुरुंगात नेणार; भटिंडा एअरबेसवरून पोलीस दिब्रुगढला रवाना

पुढारी ऑनलाइन डेस्क : Amritpal Singh : वारीस पंजाब दे चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक फरार अमृतपालला पंजाब पोलिसांनी मोगा येथील गुरुद्वारातून अटक केली. अटकेनंतर त्याला आसामच्या दिब्रुगढ येथे नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आसाममधील दिब्रुगढ तुरुंगात सुरक्षा वाढवण्यात आली असून दुपारपर्यंत अमृतपालला येथे आणले जाईल.

पंजाब पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमृतपालला ते आसामच्या दिब्रुगढ तुरुंगात ठेवणार आहे. अमृतपालला घेऊन पोलिस भटिंडा येथील एअरफोर्स स्टेशनवर आणले गेले. त्यानंतर पोलिस भटिंडा एअरबेसवरून दिब्रुगढला रवाना झाले आहेत.

Amritpal Singh : अशी झाली अमृतपालला अटक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल शनिवारी रात्री रोडे गावात पोहोचला होता. पोलिसांना तशी खात्रीशीर माहिती मिळाली. अकाल तख्त साहिबचे माजी जत्थेदार जसबीर सिंग रोडे यांनी सांगितले की, त्यांना मध्यरात्री 12.30 च्या सुमारास अमृतपालच्या आगमनाची माहिती मिळाली ते पहाटे 4 वाजता गुरुद्वारा साहिबमध्ये पोहोचले. अमृतपालने तिथे सकाळी प्रार्थना केली.

सुखचैन सिंग गिल, आयजी पंजाब पोलिस मुख्यालय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशनल इनपुटनंतर पंजाब पोलिसांनी रोडे गावाला वेढा घातला होता आणि अमृतपालला पळून जाण्याची संधी नव्हती. अमृतपालला पोलिसांनी घेरल्याचा संदेश मिळाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पंजाब पोलिस मुख्यालयाचे आयजी सुखचैन सिंग गिल म्हणतात, “अमृतपालला सकाळी 6.45 वाजता NSA अंतर्गत रोडे गावातून अटक करण्यात आली. हे पंजाब पोलिस आणि इंटेलिजन्स विंगचे संयुक्त ऑपरेशन होते. NSA वॉरंट आज सकाळी अंमलात आणण्यात आले.”

Amritpal Singh : अमृतपालच्या अटकेनंतर पंजाबमध्ये कडेकोट सुरक्षा

अमृतपालच्या अटकेनंतर पोलिसांनी सुवर्ण मंदिर, अकाल तख्त आणि अमृतपालच्या मूळ गावी जल्लूपूर खेरा येथे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. अमृतपालच्या समर्थनार्थ काही कट्टरपंथी संघटनांकडून कोणतीही निदर्शने होण्याची भीती असतानाही सामान्य सुरक्षा बळकट केली जाते.

हे ही वाचा :

Amritpal Singh Arrested : …अशी झाली अमृतपालला अटक; रोडेवाल गुरुद्वारातील साहिब जसबिर सिंह रोडे यांनी सांगितला घटनाक्रम (पाहा व्हिडिओ)

Amritpal Singh arrested : अखेर अमृतपाल सिंहच्या मुसक्या आवळल्या; मोगा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Back to top button