दिल्लीत भर न्यायालयात महिलेवर वकिलाचा गोळीबार | पुढारी

दिल्लीत भर न्यायालयात महिलेवर वकिलाचा गोळीबार

नवी दिल्ली : दिल्लीतील साकेत न्यायालयात एका वकिलाने महिलेवर गोळीबाराच्या चार फैरी झाडल्या. दोन गोळ्या महिलेच्या पोटात लागल्या, तर एक हातात लागली. महिलेला तातडीने एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती अत्यवस्थ आहे.

आर्थिक वादाशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी ही महिला न्यायालयात आली होती. घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. महिला आणि वकिलामध्ये वाद होतो. महिला वकिलाच्या दिशेने चालत जाते. वकील मागे सरकतो आणि महिलेवर गोळीबार करू लागतो. कामेश्वर प्रसाद सिंह ऊर्फ विनोद सिंह असे हल्लेखोराचे नाव आहे.

Back to top button