

पुढारी ऑनलाइन डेस्क : J&K जम्मू आणि काश्मीरमध्ये राजौरी पूंछ भागात 6-7 दहशतवादी कार्यरत असल्याची माहिती भारतील लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. पूंछमध्ये काल भारतीय लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. या हल्ल्यात या दहशतवाद्यांचा हात होता. मिळालेल्या माहितीनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर अॅक्शन मोडमध्ये आहे.
J&K भारतीय लष्कराने ड्रोन आणि टेहळणी हेलिकॉप्टरसह अनेक विशेष दलांची टीम सुरू केली आहे जे संशयित भागात शोध आणि नष्ट ऑपरेशन करत आहेत. लष्कर, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांसह सुरक्षा दले ऑपरेशनचे समन्वय साधत आहेत, अशी माहिती संरक्षण स्रोतांकडून मिळाली आहे.
दहशतवादी एलईटीचे (लष्कर ए तोय्यबा)असून ते पाकिस्तानचे असल्याचा संशय आहे. त्यांच्या या भागात प्रवेश करण्याच्या मार्गाबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. गुहा-प्रकारच्या अनेक नैसर्गिक रचना असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेण्यात येत आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे, अशी माहिती संरक्षण स्रोतांकडून मिळाली आहे. J&K
जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील भिंबरगली आणि पूँछदरम्यान लष्करी वाहनावर गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यात ट्रक जळून भस्मसात झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हे ही वाचा :