Madhya Pradesh Accident News : ट्रकने कारला 100 मीटर फरफटत नेले; युवक ठार, एक गंभीर जखमी | पुढारी

Madhya Pradesh Accident News : ट्रकने कारला 100 मीटर फरफटत नेले; युवक ठार, एक गंभीर जखमी

पुढारी ऑनलाइन डेस्क : Madhya Pradesh Accident News : आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर भयंकर अपघात घडला. यामध्ये एका ट्रकने कारला पाठीमागून धडक देत 100 मीटर फरफटत नेले. घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा एक जण गंभीर जखमी आहे. मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये ही घटना घडली.

Madhya Pradesh Accident News : मिळालेल्या माहितीनुसार, आगरा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पनिहार ठाण्यांतर्गत येणाऱ्या पनिहार टोल फ्लाझावर ही कार उभी होती. यावेळी एक अनियंत्रित ट्रकने या कारला पाठीमागून धडक दिली आणि ट्रकला 100 मीटर फरफटत नेले. या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला. तर अन्य एक युवक गंभीर जखमी आहे.

प्रवेश अग्रवाल असे मयत युवकाचे नाव असून अवनीश अग्रवाल हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे दोघेही टोल प्लाझावर टोल भरत होते. यावेळी एका वेगवान अनियंत्रित ट्रकने धडक देऊन त्यांची कार फरफटत नेली. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. Madhya Pradesh Accident News

दरम्यान या प्रकरणी पनिहार ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पनिहार पोलिस स्टेशनचे प्रभारी प्रवीण शर्मा यांनी सांगितले की, अनियंत्रित ट्रकचा वेग इतका होता की त्याने कारला 100 मीटरपेक्षा जास्त फरफटत नेले आणि कारचा चुराडा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. Madhya Pradesh Accident News

हे ही वाचा :

 INX media case : कार्ती चिदंबरम यांना ईडीचा दणका; 11.04 कोटींची मालमत्ता जप्त

हॉट ॲण्ड बोल्ड अपेक्षा पोरवालच्या नव्या लूक्सची चर्चा

Back to top button