मोठी बातमी! CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या सुमारे 1.30 लाख पदांसाठी भरती; गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी | पुढारी

मोठी बातमी! CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या सुमारे 1.30 लाख पदांसाठी भरती; गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी

पुढारी ऑनलाइन डेस्क : गृह मंत्रालयाने CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या सुमारे 1.30 लाख पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

केंद्र सरकारने सीआरपीएफ केंद्रीय राखीव पोलीस दलात गट क च्या प्रवर्गातील जनरल कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) या पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सामान्य कर्तव्य संवर्ग, गट सी पोस्ट, भर्ती नियम 2023 अंतर्गत जारी केली आहे.
एकूण 1 लाख 30 हजार पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये 1 लाख 25 हजार 262 पदे पुरुषांसाठी आहे. तर 4667 पदे महिलांसाठी असणार आहेत. 21 700 ते 69100 या गटात पे स्केल असणार आहे.

पात्रता

वयोगट : या पदासाठी 18 ते 23 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या बाबतीत वयात पाच वर्षे सूट आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत तीन वर्षे) तर अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचे उमेदवारांना वयोमर्यातदेत 5 वर्षांची सूट ्सणार आहे. तर माजी अग्निवीरांच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा तीन वर्षांपर्यंत शिथिल असणार आहे.

शैक्षणिक वयोमर्यादा : केंद्र सरकार किंवा राज्याद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समतुल्य किंवा माजी लष्करी कर्मचार्‍यांच्या बाबतीत समतुल्य आर्मी पात्रता, आवश्यक आहे.

फिटनेस पात्रता : केंद्रीय राखीव पोलीस दलातील कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदावरील भरतीसाठी शारीरिक आणि वैद्यकीय मानके केंद्र सरकारने वेळोवेळी विहित केलेल्या योजनेनुसार लागू होतील.

भरतीसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) साठी निर्धारित केलेली शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख, आवेदन शुल्क यासंबंधीची माहिती लवकरच सीआरपीएफच्या अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल.

 

हे ही वाचा :

‘आपले सरकार केंद्र’ गेल्या पाच महिन्यांपासून आयडीच्या प्रतीक्षेत

उच्चशिक्षणाला आता ‘परीस स्पर्श’; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Back to top button