Operation Sindoor | भारताच्या हल्ल्यात पाक, POK मध्ये खात्मा झालेल्या ५ दहशतवाद्यांची नावे समोर

Pakistan, POK 5 Terrorist Killed | भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवित पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ९ छावण्यांवर हल्ले चढवले होते.
Operation Sindoor
भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' राबविले होते.(File photo)
Published on
Updated on

Operation Sindoor on Pakistan, POK 5 Terrorist Killed

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलरोजी दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले होते. या घटनेनंतर भारतीय हवाई दल आणि लष्कराने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' राबवित पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ९ छावण्यांवर हल्ले चढवले होते. यात ठार झालेल्या ५ दहशतवाद्यांची नावे समोर आली आहेत.

१) मुदस्सर खादियान खास (त्याला मुदस्सर किंवा अबू जुंदाल असेही म्हणतात)

तो मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबा संघटनेच्या कारावायांचे व्यवस्थापन करत होता. पाकिस्तानच्या सैन्याकडून त्याच्या अंत्यसंस्कारात लष्करी सन्मान दिला होता. तसेच पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला होता. जमात उद दावाचा नेता हाफिज अब्दुल रौफ याने त्याच्या अंत्यसंस्काराचे आयोजन सरकारी शाळेत केले होते. यावेळी उच्चपदस्थ लष्करी आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.

२) हाफिज मुहम्मद जमील

हा जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित आहे. मौलाना मसूद अझहर (मोठा मेहुणा) शी तो संबंधित होता. बहावलपूरमधील मरकझ सुभान अल्लाह येथून तो कारवायांची देखरेख करत होता. युवा कट्टरतावाद आणि जैश-ए-मोहम्मदच्या आर्थिक कारवायांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता.

३) मोहम्मद युसूफ अझहर (उपनाम: उस्ताद जी, मोहम्मद सलीम, घोसी साहब)

हा जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित आहे. तो मसूद अझहरचा मेहुणा आहे. जैश-ए-मोहम्मदच्या शस्त्रास्त्र प्रशिक्षण कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी त्याच्यावर होती. जम्मू-काश्मीरमधील विविध दहशतवादी घटनांशी त्याचा संबंध होता. आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणात तो संशयित आहे.

४ ) खालिद (उर्फ अबू आकाशा)

हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. त्याने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणल्या आहेत. अफगाण शस्त्रास्त्र तस्करीत त्याचा सहभाग होता. फैसलाबादमध्ये त्याच्या अंत्यसंस्कारात वरिष्ठ लष्करी आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

५ ) मोहम्मद हसन खान

हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. जैश-ए-मोहम्मदचा पीओके कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी यांचा तो मुलगा होत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचे नियोजन करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

Operation Sindoor
India Pakistan Tension |पडद्यामागून चीनची पाकला मदत; 'ऑपरेशन सिंदूर' परिसंवादातील सूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news