

पुणे : युद्धात भारताचे पारडे जड असले तरी चीनच्या जोरावरच पाकिस्तान युद्ध करत आहे. चीन पडद्यामागून पाकिस्तानला मदत करीत आहे. सध्याची स्थिती ही पूर्ण युद्धाची नसून युध्दजन्य आहे. मात्र, हे युध्द फार काळ चालणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय दबाव दोन्ही देशांवर वाढत आहे. त्यामुळे युद्ध लवकरच थांबेल, असे मत ऑपरेशन सिंदूर परिसंवादात माजी राजदूतांसह भारतीय सैन्यदलातील उच्चपदस्थ निवृत्त अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.९) व्यक्त केले.
पीआयसी (पुणे इंटरनॅशन सेंटर) च्या वतीने पाषाण येथील संस्थेच्या सभागृहात ऑपरेशन सिंदुर या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात भारताचे माजी राजदूत गौतम बंबावाले, भारतीय हवाईदलाचे माजी उपप्रमुख दीपेंदु चौधरी, कर्नंल विनायक भट, ले.जन विनायक पाटणकर ,कॅप्टन डी.शर्मा यांची उपस्थिती होती. या सर्वांची प्रकट मुलाखत पीआयसीचे संचालक मे.जन.नितीन गडकरी यांनी घेतली.
माजी राजदूत गौतम बंबावाले, भारतीय हवाईदलाचे माजी उपप्रमुख दीपेंदु चौधरी,कर्नंल विनायक भट,ले.जन विनायक पाटणकर ,कॅप्टन डी.शर्मा यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल अत्यंत अभ्यासपूर्ण मते मांडली. तसेच युद्धातील अनेक बारकावे सांगितले. ते म्हणाले, भारताच्या तुलनेत पाकिस्तान हा देश अर्थिंक, समाजिक आणि मनोधर्यांने पूर्ण खचलेला देश आहे. तरीही तो लढतोय, कारण चीनचे पाठबळ त्यांना आहे. कारण चीनला भारतची आर्थिंक प्रगती पहावत नाही. यामुळेच चीन पाकिस्तानला या युध्दात पडद्यामागून मदत करीत आहे.
हे युध्द पाकिस्तानने सुरु केले आहे. भारताने फक्त प्रत्युत्तर दिले आहे. आपण पाकिस्तानला नामोहरम केले. जगात आजवर कोणत्याही देशाने जे काम केले नाही, ते भारताने केले. अवघ्या २५ मिनिटात ९ दहशतवादी स्थळे उध्वस्थ केली, ही बाब सोपी नाही. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले निर्णय अगदी अचूक असून भारतीय सैन्यदलाने चोख कामगिरी बजावली. त्यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. मात्र, हे युद्ध लवकर थांबवावे लागणार आहे. कारण, आंतराष्ट्रीय दबाव दोन्ही देशांवर वाढत आहे.
युद्धाची रणनिती, भाषा गत दहा वर्षात बदलली आहे.
दोन देशातील वादांमुळे ठिणगीचे रुपांतर युद्धात होण्याचे प्रमाण वाढले.
भारताने चीन १९६२, पाकिस्तान १९७१ आणि कारगील १९९९ मध्ये केलेल्या युद्धापेक्षा आता खूप मोठी प्रगती केली आहे.
पाकिस्तान भारतातील सामान्य नागरिकांना लक्ष करीत आहे.
भारताने फक्त दहशतवादी अड्यांना लक्ष केले होते .
भारतातील सरकार, सैन्यदल आणि नागरिकांचे मनोबल पाकिस्तान पेक्षा खूप चांगले
पाकिस्तानने राजस्थान सीमेवर पहिल्यांदाच हल्ला केला
भारतीय नौदल युद्धात उतरल्यास पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागणार
पाकिस्तानातील राज्यकर्ते लष्कराचे बाहुले बनल्यानेच देशाची ही स्थिती