कोटा : चार सेकंदांत आयुष्य संपले; कोटा मिरवणुकीत विजेचा धक्का, तिघांचा मृत्यू  | पुढारी

कोटा : चार सेकंदांत आयुष्य संपले; कोटा मिरवणुकीत विजेचा धक्का, तिघांचा मृत्यू 

कोटा : कोटा जिल्ह्यात रामनवमीच्या मिरवणुकीत विजेचा धक्का बसल्याने 3 युवकांचा मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर भाजले. सुलतानपूर शहरातील कोटददीप गावात हा अपघात झाला.

रिंगणातील तरुण कसरती करत असताना वरून जाणार्‍या हाय टेन्शन लाईनवर एका तरुणाने उंचावलेले चक्र अडकले आणि ही दुर्घटना घडली. चक्र काढताना 7 जणांना विजेचा शॉक बसला. सुलतानपूर रुग्णालयात सर्वांना दाखल करण्यात आले. पैकी 3 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. स्टंट करणारे सर्व युवक श्री मंशापूर्ण व्यायामशाळेचे (बडोद नगर) सदस्य होते.

Back to top button