Ayodhya Ram Mandir : दुमदुमला भारत! अयोध्येत येताहेत श्रीराम !! युगानुयुगे कायम राहील शरयूतटी मुक्काम !!!

Ayodhya Ram Mandir : दुमदुमला भारत! अयोध्येत येताहेत श्रीराम !! युगानुयुगे कायम राहील शरयूतटी मुक्काम !!!
Published on
Updated on

अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ४ वर्षांनी अयोध्येत राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारणीच्या स्वप्नपूर्तीतील पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. पुढील एक हजार वर्षांपर्यंत मंदिराला डागडुजीची गरज पडणार नाही. मंदिराची उभारणीच अशा प्रकारे करण्यात आली आहे. नागर शैलीतील हे मंदिर युगानुयुगे भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा मानदंड असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांचे आख्यान गात राहील. मंदिराचे गर्भगृह तयार आहे. राम मंदिर योजना तीन टप्प्यांत पूर्ण होईल. योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत तळमजल्याचे काम पूर्ण झालेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमी-बाबरी मशीद वादात २०१९ मध्ये ऐतिहासिक निवाडा दिला होता. तद्नंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केली. मंदिराचा आराखडा तयार झाला.

नो स्टील, नो सिमेंट, मंदिर रॉक्स

राजस्थानच्या मिर्झापुरातील बन्सी – पहाडपूरच्या गुलाबी बलुआ दगडातून तसेच नक्षीकाम केलेल्या संगमरवरातून मंदिराचे काम मुख्यतः झाले आहे. मंदिरात पोलाद किंवा सामान्य सिमेंटचा वापर झालेला नाही.

आकडे बोलतात, मजबुती तोलतात

17 हजार ग्रेनाईट खडकांचा वापर बांधकामात झालेला आहे.
2 टन प्रत्येक खडकाचे वजन आहे. २१ लाख क्युबिक फूट खडकाचा (ग्रेनाईट, बलुआ, संगमरवर) मिळून या क्षणापर्यंत वापर झालेला आहे.
12 मीटर खोल पाया आयआयटी चेन्नईने दिलेल्या सल्ल्यानुसार खणलेला आहे.
28 दिवसांतच पाया द्वार भरताना वापरलेली माती खडकात रूपांतरित होते, अशा स्वरूपाची आहे.
47 स्तर एकुणात या पायामध्ये करण्यात आले आहेत.
1 हजार वर्षे इथून पुढे काही झाले तरी मंदिराला साधे खरचटणारही नाही, मग तडा वगैरे दूरच्याच गोष्टी!
6.5 तीव्रतेचा भूकंपही या मंदिराच्या पायाला हलवू शकणार नाही, अशी त्याची रचना आहे.

भक्कमही, भावगर्भही…

मंदिर भक्कम असावे, हा मुख्य हेतू असला तरी उभारणीमध्ये भावनांचा हळुवारपणा दुर्लक्षिण्यात आलेला नाही. तोही तितक्याच भक्कमपणे जपलाय. उदाहरणार्थ… १९९२ मधील शिला दान उपक्रमादरम्यान देशभरातून रामभक्तांकडून गोळा करण्यात आलेल्या विटा जशाच्या तशा वापरल्या गेल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेकडून अयोध्येतील कारसेवकपूरममध्ये नक्षीकामासाठी आणले गेलेले दगडही आवर्जून वापरले आहेत.

पुढे काय ?

  • २२ जानेवारी २०२४ प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल
  • २७ जानेवारी २०२४ सर्वसामान्यांसाठी मंदिर खुले होण्याची शक्यता
  • डिसेंबर २०२४ : मंदिर उभारणीचा दूसरा टप्पा पूर्ण होणार
  • डिसेंबर २०२५ : उभारणीचा तिसरा आणि अंतिम टप्पा पूर्ण होईल

राम मंदिर उभारणी सुरुवात, सद्यस्थिती

९ नोव्हेंबर २०१९

सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तीच्या पीठाने वादग्रस्त २.७७ एकर जमीन राम मंदिरासाठी ट्रस्टला बहाल करण्याचा ऐतिहासिक निकाल दिला. या जमिनीच्या मोबदल्यात सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद उभारणीसाठी ५ एकर जमीन देण्याचेही ठरले.

५ फेब्रुवारी २०२०

न्यायालयाच्या आदेशाबरहुकूम केंद्र सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली.

६ फेब्रुवारी २०२०

केंद्र सरकारने एक रुपयाचे प्रतीकात्मक दान देऊन राम मंदिर उभारणी अभियानाचा शुभारंभ केला.

१९ फेब्रुवारी २०२०

श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टची पहिली बैठक दिल्लीला झाली. त्यात महंत नृत्य गोपाल दास यांना अध्यक्ष, तसेच विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस चपत राय यांना सचिवपदी नेमले गेले. नृपेंद्र मिश्रा यांची मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

१५ मार्च २०२०

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकाराने रामलल्लाची मूर्ती तात्पुरत्या स्वरूपाच्या मंदिरात हलविण्यात आली.

५ ऑगस्ट २०२०

राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी या अनुष्ठानात यजमान म्हणून उपस्थित राहिले.

१५ जानेवारी २०२१

राम मंदिरासाठी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देणगी अभियान सुरू झाले. ट्रस्टकडे या अभियानातून जवळपास ३ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी जमला.

१ जून २०२२

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंदिराच्या गाभाऱ्याची पायाभरणी केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news