राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत AICC ची बैठक सुरू | पुढारी

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत AICC ची बैठक सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस कमिटीच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. ही बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, के. सी. वेणुगोपाल, पी. चिंदबरम यांचीही या बैठकीला उपस्थिती आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button