तीन महिन्यात 2.78 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाल्याची नितीन गडकरी यांची माहिती | पुढारी

तीन महिन्यात 2.78 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाल्याची नितीन गडकरी यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : जानेवारी ते मार्च 2023 या तीन महिन्यांच्या कालावधीत 2.78 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत लेखी उत्तरादाखल दिली. आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश या दोन राज्यांनी वाहन पोर्टलमध्ये मायग्रेशन करण्यास सुरुवात केली असून इलेक्ट्रिक वाहनांची नोंद या पोर्टलमध्ये सुरु झाली असल्याचे गडकरी यांनी उपप्रश्नामध्ये सांगितले.
वाहन पोर्टलमधील आकडेवारीनुसार वर्ष 2021 मधील 3 लाख 29 हजार 808 वाहनांच्या तुलनेत वर्ष 2022 मध्ये 10 लाख 20 हजार 679 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. दरम्यान वर्ष 2016-17 ते 2022-23 या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गांच्या दुतर्फा 344.27 लाख झाडे लावली असल्याचे गडकरी यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.

हेही वाचंलत का?

 

Back to top button