Death Sentence | फाशीला दुसरा पर्याय आहे का?, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा | पुढारी

Death Sentence | फाशीला दुसरा पर्याय आहे का?, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दोषींना फाशीच्या (Death Sentence) तुलनेत अन्य कमी वेदनेचा पर्याय देता येईल का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. यासंदर्भात विचार करण्याची सूचना देखील न्यायालयाने केली आहे. दोषींना वेदनारहीत शिक्षा देण्यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयात सुनावणी सुरू असून आता २ मे रोजी पुढील सुनावणी घेण्यात येईल. बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फाशीऐवजी अन्य पर्याय काय असू शकतो? यावर न्यायामूर्तींनी चर्चा केली. न्यायालयाने शिक्षेसंदर्भात सरकारला चर्चा करण्यास सांगितले असून फाशीच्या तुलनेत इतर अन्य पर्यायांचा विचार करून माहिती संकलीत करण्यासही सांगितले आहे.

अँटर्नी जनरल आर. व्यंकटरामाणी यांना फाशीच्या शिक्षेने परिणाम होत असल्यास त्यासंदर्भात न्यायालयात माहिती देण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहे. या विषयावर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचा पर्याय खुला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. दोषींना वेदनारहीत शिक्षा देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली असून फाशीऐवजी (Death Sentence) गोळी मारणे, प्राणघातक इंजेक्शन अथवा इलेक्ट्रिक खुर्चीचा पर्याय सूचवण्यात आला आहे.

दरम्यान, प्राणघातक इंजेक्शन देखील वेदनादायक आहे. गोळी मारणे हा मानवी हक्कांचे पुर्णपणे उल्लंघन करून लष्करी राजवटीचा आवडता टाईमपास होता, असे निरीक्षण सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नोंदवले. ही पद्धत प्रमाणिकतेच्या चाचणीवर समाधानी आहे की नाही? हे तपासावे लागेल. जर दुसरी पद्धत अवलंबली जावू शकते, तर फाशी देवून मृत्यू असंवैधानिक म्हणून घोषित केला जावू शकतो, असे सरन्यायाधीश म्हणाले.

मृत्यूमध्ये सन्मान असला पाहिजे हा प्रश्न स्पर्धेत नाही अथवा कमी वेदना देणारा नाही. फाशी या दोन्ही अटी पूर्ण करते असे दिसते. प्राणघातक इंजेक्शन या प्रमाणात समाधान मिळते का? असा सवाल न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांनी उपस्थित केला. प्राणघातक इंजेक्शनमध्ये कुठले केमिकल वापरले जाईल, यावरही संशोधन करण्याचे आवाहन न्यायमूर्तींनी केले.

हे ही वाचा :

Back to top button