PM Fumio Kishida : पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे पीएम मोदींना जपान भेटीचे निमंत्रण | पुढारी

PM Fumio Kishida : पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे पीएम मोदींना जपान भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन : भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (PM Fumio Kishida)  यांनी आज (दि.२०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 हिरोशिमा शिखर परिषदेचे निमंत्रण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुमियो किशिदा यांचे स्वागत करत त्यांचे निमंत्रण स्वीकारले.

मी पंतप्रधान मोदींना G7 हिरोशिमा शिखर परिषदेसाठी औपचारिक निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदी यांनी माझे आमंत्रण त्वरित स्वीकारले, असे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (PM Fumio Kishida)  यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, फुमियो किशिदा यांना भेटताना प्रत्येक वेळी भारत-जपान द्विपक्षीय संबंधांबद्दल सकारात्मकता आणि वचनबद्धता जाणवते. गेल्या वर्षभरात पंतप्रधान फुमियो किशिदा आणि मी अनेक वेळा भेटलो आहे. प्रत्येक वेळी मला त्यांची सकारात्मकता आणि भारत-जपान द्विपक्षीय संबंधांबद्दलची वचनबद्धता जाणवली. त्यांची आजची भेट भारतासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

पीएम किशिदा यांच्याशी भारताच्या G20 अध्यक्षपदाबद्दल चर्चा केली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले, आज मी पंतप्रधान किशिदा यांना भारताच्या G 20 अध्यक्षपदाच्या प्राधान्यक्रमांबद्दल तपशीलवार सांगितले. G20 अध्यक्षपदाचा एक महत्त्वाचा पाया म्हणजे वसुधैव कुटुंबकमवर विश्वास ठेवणारी, सर्वांना एकत्र आणून पुढे जाण्यावर विश्वास ठेवणारी भारताची संस्कृती आहे, असे मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button