कांदा उत्पादनात भारत जगात दुसरा | पुढारी

कांदा उत्पादनात भारत जगात दुसरा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सध्या जागतिक पातळीवर कांद्याचे दर चढे असले तरी भारतात ते कोसळले आहेत. यंदा कांद्याचे प्रचंड उत्पादन झाल्यामुळे महाराष्ट्रात कांद्याला प्रतिक्विंटल तीनशे रुपये अनुदान देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. जरी कांदा निर्यातीवर बंदी नसली तरी कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे आणि देशभरात पुरेशी शीतगृहे उपलब्ध नसल्यामुळे कांदा मातिमोल भावाने विकला जात आहे.

जगाचा विचार केला, तर कांदा उत्पादनात चीन पहिल्या क्रमांकावर आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात सरासरी कांद्याचे उत्पादन २४.२५ दशलक्ष टन केले जाते आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे ३७.२ टक्के आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.

Back to top button