गुजरात भाजपच्या चारच खासदारांना पुन्हा संधी! | पुढारी

गुजरात भाजपच्या चारच खासदारांना पुन्हा संधी!

गांधीनगर; वृत्तसंस्था :  लोकसभा निवडणुकीला वर्षावर कालावधी उरलेला असताना भाजपने ‘मिशन २०२४ ‘ साठी आतापासून तयारी सुरू केली आहे. मे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप विद्यमान २६ खासदारांपैकी केवळ ४ खासदारांना पुन्हा उमेदवारी देणार आहे.

अमित शहा (गांधीनगर), सी. आर. पाटील (नवसारी), विनोद चावडा (कच्छ), भारतीबेन शियाल (भावनगर) यांना रिपीट केले जाईल. उर्वरित २२ जागी पक्षाने नवे उमेदवार • देण्याची तयारी चालवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गुजरातेत असताना ‘राजभवनातील बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठीची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली. विधानसभा निवडणुकीतील यशाचा फॉर्म्युलाच लोकसभेसाठीही वापरला जाणार आहे.

Back to top button