

पुढारी ऑनलाइन डेस्क : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मनी लाँड्रिंग प्रकरणी दोन फुटीरतावादी नेत्यांच्या घरावर छापे टाकले. विद्यार्थ्यांना पाकिस्तानी महाविद्यालयात एमबीबीएसच्या जागा वाटपाच्या रॅकेटशी संबंधित हे प्रकरण आहे. ईडीने जवळपास 9 ठिकाणांवर हे छापे टाकल्याची माहिती आहे.
ईडी ने धडक कारवाई करत आज गुरुवारी हुर्रियत कॉन्फरन्सचे काझी यासिर आणि जम्मू काश्मीर साल्व्हेशन मूव्हमेंटचे अध्यक्ष जफर भट या दोन फुटिरतावादी नेत्यांच्या घरावर छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील विद्यार्थ्यांना पाकिस्तानमधील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागा वाटपाच्या रॅकेटशी संबंधित हे प्रकरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने स्थानिक पोलिसांसह काझी यासिर याच्या अनंतनागमधील काझी मोहल्ला येथील घरावर छापा टाकला. तर मोहम्मद अकबर भट उर्फ जफर भटच्या घरावर छापा टाकला. माहितीनुसार, एकूण 9 जागांवर छापे टाकण्यात आले आहे. अद्याप ईडीने याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हुर्रियत नेते काझी यासिर यांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स गेल्या महिन्यात अनंतनागमधील अधिकाऱ्यांनी पाडले होते. अतिक्रमित सरकारी जमिनीवर बांधले गेले होते म्हणून ती कारवाई करण्यात आली होती. श्रीनगरच्या बाग-ए-मेहताब आणि अनंतनागच्या काझी मोहल्लामध्ये छापे टाकण्यात आले. एजन्सीने सय्यद खालिद गिलानीच्या घरावरही छापा टाकला.
हे ही वाचा