होळीनिमित्त गुरुजींची अनोखी ‘शिकवणी’, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल | पुढारी

होळीनिमित्त गुरुजींची अनोखी 'शिकवणी', व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची स्वतःची एक वेगळी पद्धत असते. यातूनच तो इतर शिक्षकांपेक्षा वेगळा ठरत असतो. सोशल मीडियामध्ये आपण दररोज कोणता ना कोणता व्हायरल व्हिडीओ पाहत असतो. असाच एका शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सध्‍या तुफान व्‍हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये  शिक्षक अनोख्या पद्धतीने होळीनिमित्त विद्यार्थ्यांना रंगांची ओळख करुन देताना दिसत आहेत. (Holi 2023)

उत्तर भारतात होळी सण मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. अशातच  एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ बिहारमधील एका शिक्षकाचा आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या रंगांची नावे शिकवण्याची ही हटके पद्धत नेटकर्‍यांना खूप आवडली आहे. याच शिक्षकाने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी दारूबंदीवरील गाणे गायले होते. आता होळी सणानिमित्त रंगांची इंग्रजीतील नावांची ओळख करुन देणारे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Holi 2023 : काय आहे व्हिडिओमध्ये?

व्‍हायरल होत असलेल्‍या व्हिडिओमध्ये शिक्षक  ब्लॅकबोर्डसमोर उभे असल्याचे दिसत आहे.  फलकावर  होळी विशेष वर्ग. यासोबतच  इंग्रजी आणि हिंदी नावांसह सात रंगांची नावे लिहिलेली आहेत. या शिक्षकाने स्वतःचे गाल वेगवेगळ्या रंगांनी सजवले आहेतआणि ते गाणे गुणगुणत आहेत. गुरुजी गाताना सांगत आहेत की, रेड म्हणजे लाल आणि येलो म्हणजे पिवळा. त्याचप्रमाणे ग्रीन म्हणजे हिरवा आणि ब्लॅक म्हणजे काळा. व्हिडिओमध्ये मुलेही गाणे गुणगुणताना दिसत आहेत. केवळ मुलेच नाही तर वर्गात खुर्च्यांवर आरामात बसलेल्या आणखी दोन महिलाही मास्तरांचे गाणे अतिशय लक्षपूर्वक ऐकताना दिसत आहेत.

 एका ट्विटर हँडलने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर  केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘गुरुजींची होळी!

हेही वाचा 

Back to top button