Vijayapriya Nithyananda : ‘आम्ही भारताचा आदर करतो’, विजयप्रिया नित्यानंद यांचे स्पष्टीकरण | पुढारी

Vijayapriya Nithyananda : 'आम्ही भारताचा आदर करतो', विजयप्रिया नित्यानंद यांचे स्पष्टीकरण

पुढारी ऑनलाईन : वादग्रस्त स्वयंभू धर्मगुरू नित्यानंद यांच्यावर भारतात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या स्वयंघोषित धर्मगुरूला भारताने फरारी घोषित केले आहे. जिनिव्हा येथे आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत (दि.१) नित्यानंद याचे अनेक शिष्य सहभागी झाले आहेत. त्यामधील त्यांची शिष्या विजयप्रिया नित्यानंद यांनी भाषणात बोलताना भगवान नित्यानंद यांना त्यांच्या जन्मस्थळी हिंदू विरोधी घटकांकडून त्रास दिला जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नित्यानंद यांची शिष्या विजयप्रभा यांनी आम्हाला भारताप्रती आदर असल्याचे स्पष्ट केले आहे. विजयप्रिया नित्यानंद यांनी ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास’च्या (तथाकथित) स्थायी ‘राजदूत’ असल्याचा दावा केला आहे.

पुढे बोलताना नित्यानंद यांची शिष्या विजयप्रिया यांनी म्हटले आहे, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, मी भारताविरूद्ध काहीही बोललो नाही ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासला (यूएसके) भारताबद्दल आदर आहे आणि आम्ही भारताला गुरू मानतो. संयुक्त राष्ट्रातील माझ्या विधानावरून गैरसमज निर्माण केला जात आहे. काही हिंदू विरोधी घटक माझ्या विधानाचा विर्पयास करीत असल्याचा आरोप नित्यानंद यांची शिष्या विजयप्रिया यांनी केला आहे.

हिंदू विरोधी घटकांवर कारवाईची मागणी

विजयप्रिया यांच्यावरील टीकेनंतर त्यांनी या हिंदू विरोधी घटकांविरूद्ध भारत सरकारने कारवाई करावी अशी मागणी तिने व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, हे विभाग कैलासाविरूद्ध सतत हल्ला आणि हिंसाचार करतात. हिंदू विरोधी लोक भारतीय लोकसंख्येचा एक छोटासा भाग आहेत. त्यांच्या कृती संपूर्ण भारतावर प्रश्न निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे हिंदू विरोधी लोकांच्या कारवाया संपवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत तक्रार

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार समितीने आयोजित केलेल्या चर्चेदरम्यान विजयप्रिया यांनी ‘हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु’ म्हणून संरक्षण मिळावे अशी मागणी केली. नित्यानंद यांचा त्यांची जन्मभूमी असेलेल्या भारतात त्यांचा छळ केला तसेच त्यांच्यावर देशात बंदी घातली आहे, अशी तक्रार त्यांनी यावेळी केली.

कोण आहेत विजयप्रिया नित्यानंद?

भारतात बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला वादग्रस्त स्वयंभू धर्मगुरु नित्यानंद याने स्थापन केलेला तथाकथित देश ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा (यूएसके)’ (The United States of KAILASA) चे प्रतिनिधी गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी झाले होते. या सहभागाने भारतातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या शिष्टमंडळातील सर्व सदस्य महिला होत्या. नित्यानंद याच्या ट्विटर अकाऊंटवर शिष्टमंडळाची छायाचित्रे पोस्ट करण्यात आली आहेत. शिष्टमंडळात विजयप्रिया नित्यानंद (Vijayapriya Nithyananda) यांचाही समावेश होता. विजयप्रिया नित्यानंद ही महिला कैलासाची कायमस्वरुपीची राजदूत म्हणून जीनिव्हा येथील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीच्या बैठकीत सहभागी झाली होती.

Back to top button