टेक ऑफवेळी SpiceJet विमानाचे ब्लेड तुटले; मोठी दुर्घटना टळली, कोलकत्ता विमानतळावर हायअलर्ट | पुढारी

टेक ऑफवेळी SpiceJet विमानाचे ब्लेड तुटले; मोठी दुर्घटना टळली, कोलकत्ता विमानतळावर हायअलर्ट

पुढारी ऑनलाईन: बँकॉकला जाणाऱ्या स्पाईसजेटचे विमानाचे टेक ऑफवेळी डाव्या इंजिनमधील ब्लेड तुटले. बिघाड झालेले विमान पुन्हा कोलकाता विमानतळावर उतरविण्यात आले. दरम्यान, कोलकत्ता विमानतळावर हायअलर्ट जारी करण्यात आल्याचे वृत्त ‘टाईम्स’ने दिले आहे. या विमानाने १७८ प्रवासी आणि ६ क्रिव्ह होते. विमानाने सोमवारी मध्यरात्री एक वाजता कोलकत्ता विमानतळावरून उड्डाण केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकला जाणाऱ्या विमानाने रात्री एकच्या सुमारास उड्डाण केले. उड्डाणा दरम्यान विमानाच्या इंजिनचा एक ब्लेड तुटल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले.  १.३० च्या दरम्यान हे विमान पुन्हा कलकत्ता विमानतळाकडे वळवून खाली उतरविण्यात आले. दरम्यान, कोलकत्ता विमानतळावर हायअलर्ट देण्यात आला होता. यावेळी विमानतळावर अग्निशमन दल, रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी, CISF आणि आपत्कालीन निर्वासन पथक तैनात करण्यात आल्याची माहिती कंपनी अधिकाऱ्यांनी दिली.

विमानात झालेला बिघाड वैमानिकाच्‍या लक्षात आला. विमान सुरक्षितपणे विमानपट्टीवर उतरवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विमान कंपनीने सोमवारी (दि.२७) सकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली.

हेही वाचा : 

Back to top button