मी नेहमीच धोनीचा उजवा हात होतो : विराटने केला कर्णधारपदाबाबत खुलासा | पुढारी

मी नेहमीच धोनीचा उजवा हात होतो : विराटने केला कर्णधारपदाबाबत खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एम.एस. धोनी याच्‍याकडून टीम इंडियाचा कर्णधारपद स्‍वीकारण्‍याबाबत विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे. “मी मैदानावर नेहमीच एमएस धोनीच्‍या मार्गदर्शनाखाली खेळलो. त्‍याने खूप लवकर मला आपल्‍या पंखाखाली घेतले. मैदानावर मी नेहमीच धोनीचा उजवा हात होतो.” असे विराट कोहलीने म्‍हटलं आहे. ( Virat and MS Dhoni )

‘इंडियन एक्‍स्‍प्रेस’शी बोलताना विराट म्‍हणाला की, २००८ ते २०१९ या काळात मी धोनीसोबत ड्रेसिंग रुम शेअर केली. याच काळात मी मैदानावर धोनीचा उजवा हात होतो. या काळात मैदानावर कोणती रणनीती आखावी, हे मी धोनीकडूनच शिकलो. आमच्‍या दोघांमध्‍ये कधीच गैरसमज झाले नाहीत.

Virat and MS Dhoni : धोनीने मला कर्णधारपदासाठी तयार केले

धोनीने मला एकप्रकारे त्‍याच्‍या पंखाखाली घेतले होते. २०१२ पासून त्‍याने मला कर्णधारपदासाठी तयार केले. धोनी नेतृत्त्‍व करत असलेल्‍या संघात मी उपकर्णधार होतो. मी त्‍यांच्‍याकडून कर्णधारपद स्‍वीकारणार आहे, याची त्‍याला माहिती होती. मी नेहमीच त्‍याचा खेळ समजून घेत होतो. याच काळात मी संघासाठी खूप मॅच-विनिंग खेळी केल्‍या. यातूनच माझा आत्‍मविश्‍वास दुणावला. कर्णधारपद माझ्‍याकडे सोपविण्‍याची प्रक्रिया सहज पार पडली, असेही कोहलीने नमूद केले आहे.

आमची मैदान व मैदानाबाहेर क्रिकेटवर चर्चा होत असे. खेळात चुरस असताना मी त्‍यांच्‍याबरोबर चर्चा करत असे. या काळात खेळताना मी कधीच स्‍कोअरबोर्ड पाहिला नाही. स्‍कोअर किती आहे, खेळपट्टी कशी आहे, प्रतिस्‍पर्धी संघातील खेळाडूंची भागीदारी मोठी होत असेल तर ती कशी तोडावी याबाबत मी विचार करतो हे धोनीला समजत होते. धोनीने भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व कसे केले, त्याच्याबद्दल नेहमीच आदर होता आणि आजही तो कायम आहे, असेही कोहलीने यावेळी सांगितले.

हेही वाचा :

 

Back to top button