‘सेवा, संघर्ष और बलिदान सबसे पहले हिंदुस्तान’ : काँग्रेसची नवी घोषणा | पुढारी

'सेवा, संघर्ष और बलिदान सबसे पहले हिंदुस्तान' : काँग्रेसची नवी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : “सेवा, संघर्ष और बलिदान सबसे पहले हिंदुस्तान” अशी नवी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. छत्तीसगड मधील रायपूर येथे काँग्रेसच्या ८५ व्या पूर्ण अधिवेशनाचा आज (दि. २५) दुसरा दिवस आहे. यावेळी ते बोलत होते.

यावेळी खरगे म्हणाले की, “काँग्रेसचे पूर्ण अधिवेशन थांबवण्यासाठी भाजपने कार्यकर्त्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली. पण आम्ही त्यांचा सामना केला आणि हे अधिवेशन आयोजित केले, असा आरोप खरगे यांनी भाजपवर केला. सर्व आव्हानांना आपण तोंड देऊ. भारत जोडो यात्रा ही देशासाठी सूर्यप्रकाशासारखी होती. हजारो लोकांनी राहुल गांधींशी हातमिळवणी करून काँग्रेस अजूनही त्यांच्या हृदयात असल्याचे सिद्ध केले,” असेही खर्गे यांनी म्हटले आहे.

Back to top button